कोकण

संत गोरा कुंभारांचा भक्तिमय देखावा दर्शनीय

CD

- rat३०p११.jpg-
P२५N८८१३५
पालघर : सागवेकर कुटुंबीयांनी उभारलेला संत गोरा कुंभार भक्तिमय चलचित्र देखावा.

पालघरमध्ये संत गोरा कुंभारांचा देखावा
सागवेकर कुटुंब; टाकाऊपासून टिकाऊचा संदेश
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३० ः घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विविध पुरस्कार पटकावणारे तालुक्यातील पालघर येथील रवींद्र सागवेकर यांचा यंदाचा देखावा विशेष ठरला आहे. सागवेकर कुटुंबीयांनी संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित नामस्मरण भक्तिमय चलचित्र देखावा उभा केला असून, तो गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.
सागवेकर यांच्या वडिलांनी २५ वर्षांपूर्वी सुरू केलेली देखाव्याची परंपरा आज नातवंडे पुढे नेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून घरातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन हा देखावा साकारला आहे. भौतिक प्रगती साधताना भक्तीमार्ग विसरू नका, नामस्मरण करताना स्वतःलाही विसरून जा, हा संदेश यातून दिला जात आहे. या देखाव्यात संत गोरा कुंभार विठ्ठलाच्या नामस्मरणात इतके गुंग होतात की, आपल्या लेकराकडेही त्यांचे लक्ष राहत नाही. तो मुलगा मातीत मिसळतो. पत्नीच्या शोकाकूल अवस्थेकडे पाहून पांडुरंग विठ्ठल अवतरतो आणि भक्ताच्या भक्तीचा व मातृत्वाचा गौरव करत बाळ परत देतो, हा प्रसंग प्रभावीपणे उभा करण्यात आला आहे. पुतळ्यांना दिलेली हालचाल, त्यांना मिळालेला खरा आवाज, सजावट आणि सुंदर प्रकाशयोजना हे या देखाव्याचे वैशिष्ट्य ठरत आहे. सागवेकर कुटुंबीयांनी वैयक्तिक पातळीवर हाती घेतलेला हा उपक्रम गणेशभक्तांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.
-----
कोट
संत गोरा कुंभार देखाव्यात टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. यातून पर्यावरणपूरक निर्मिती साकार केली असून, देखाव्याच्या माध्यमातून भक्ती, नामस्मरण यांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उभारणी करताना स्वनिर्मितीचा आनंद मिळाला असून, भाविकांच्या कौतुकाने परिश्रमाचे सार्थक झाले आहे.
- ऋणाली सागवेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Marathe Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Latest Marathi News Live Updates : पुण्यात आजपासून तीन दिवस मद्यविक्री बंद

Maratha Reservation History: सर्वात पहिलं आंदोलन कधी आणि कसं झालं होतं, १९८२ ते २०२५ आतापर्यंत काय घडलं, इतिहास जाणून घ्या?

Chandrakant Patil:'राजकीय आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आंदोलन'; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

MLA Sadabhau Khot: गोरक्षकांकडून ग्रामीण अर्थव्यवस्था संपविण्याचे काम: आमदार सदाभाऊ खोत; 'धर्माचा बुरखा पांघरून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू'

SCROLL FOR NEXT