कोकण

प्रेम एकाशी साखरपुडा दुसऱ्याशी

CD

मैत्री एकीशी साखरपुडा दुसरीशी
करण्याचा प्रकार तरुणाच्या अंगलट
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३१ : मैत्री एकीबरोबर आणि साखरपुडा दुसऱ्या मुलीशी करण्याचा प्रकार जिल्ह्यातील एका तरूणाला भोवला असून संतापलेल्या त्या मैत्रिणीने पोलिस ठाण्यात ‘त्या’ तरुणाविरोधात तक्रार दाखल दिली आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणाची एका मुलीशी ओळख झाली. दरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर २०२३ मध्ये त्याने तिला माझ्याची लग्न करशील का? असेही विचारले होते. एकदा तिला जेवणासाठी बाहेर नेले होते. त्यावेळी तिच्याशी गैरवर्तन केले. मात्र त्या मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मी तुझा होणारा नवरा असून तुझे फोटो मला पाठव, असे सांगत त्या मुलीकडे शरीरसंबंध ठेवण्याचा हट्ट धरला. त्याला मुलाने नकार दिला होता. २७ ऑगस्टला तरुणाने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्याचे फोटो संबधित मुलीने पाहिल्यावर ती प्रचंड नाराज झाली. तिने पोलिस ठाण्यात त्या तरुणाविरोधात लग्नाचे आमिष दाखवून त्रास दिल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मरेपर्यंत हटणार नाही, माझ्यानंतरही शांतपणे आंदोलन करा; जरांगे आंदोलनावर ठाम, म्हणाले, फडणवीसांबद्दल कटुता नाही

Solapur Crime:'लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार'; फॉरेस्टमध्ये बोलवल अन्..

Donald Trump Tarrif: शून्य आयातशुल्काची भारताची ‘ऑफर’! ट्रम्प यांचा नवा दावा; मात्र आता उशीर झाल्याचे मत

Viral Video: मदरशातील ‘तंत्रिक बाबा’ बेपर्दा! महिलेसोबत अश्लील कृत्य सीसीटीव्हीत कैद, व्हिडिओ व्हायरल होताच पळाला...

MLA Ashokrao Mane : बापू हळूच गावात येतात आणि भजी खाऊन जातात, प्रचारासाठी गुडघ्याच्या वाट्या झिजवलेल्या कार्यकर्त्याचा आमदार मानेंना थेट सवाल

SCROLL FOR NEXT