कोकण

मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिण दर्शवणारा देखावा

CD

rat३१p२४.jpg ः
P२५N८८३६८
पालघरवाडी: सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचे बालकलाकार प्रवेशद्वारावर देखाव्याचे माध्यमातून समाजप्रबोधन स्वागत करताना.
----
देखाव्यातून मोबाईलमुक्तीचा संदेश
पालघरवाडी गणेशोत्सव; पारंपरिक खेळांचे महत्त्व
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३१ : तालुक्यातील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोबाईलच्या अतिवापरावर प्रबोधन करणारा संदेश जिवंत देखाव्याद्वारे दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना, टाकाऊ वस्तूंमधून शक्य तितक्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे.
बदलत्या परिस्थितीत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या जीवनाचा मोबाईल हा अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडियावरील ‘रिल्स’ आणि मोबाईल गेम्समध्ये लोकांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे. मोबाईलच्या अतिवापराचा मानवी आरोग्याबरोबरच समाजजीवनावरही विपरीत परिणाम होत आहे. येथे सादर केलेल्या देखाव्यात खेळणारी, बागडणारी व उत्साहाने भरलेली मुले आता मोबाईलवर खेळताना दिसतात हे दर्शविण्यात आले आहे. घराशी आणि समाजाशी त्यांचे नाते तुटत चालले आहे, हे थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईलपासून कुटुंब सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यासाठी पालघरवाडीतील बालगोपाळ गणेश मंडळाने लहान मुलांचे खेळांशी संबंधित प्रात्यक्षिक सादर केले आहे. त्यात पालघरवाडीतील बालकलाकार लगोरी, अबादुबी, गोट्या, विटू दांडू, आईचे पत्र हरविले, पकडा पकडी, आंधळी कोशिंबीर असे एकाहून एक पारंपरिक खेळ खेळताना दिसतात. या सादरीकरणानंतर समारोपावेळी ‘मोबाईलचा शक्य तितका कमी वापर करावा,’ असा ठळक संदेश दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha reservation GR: ओबीसींना फायदा नाही, SC ST ला खड्यात घालण्याच काम... विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

अल्पवयीन मुलांना डिप्रेशनमधून बाहेर काढणार एआय; OpenAI कडून मोठी घोषणा, कसं वापरायचं, जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : छगन भुजबळ नाराज? मंत्रिमंडळाच्या बैठकीला मारली दांडी

Shambhuraj Desai: अहिल्यादेवींचे स्मारक आत्मगौरवाचे प्रतीक: पालकमंत्री शंभूराज देसाई; 'धनगर समाजाच्या मागण्या अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या'

Pune News : कारवाईच्या धसक्याने पाणीमीटर; महिन्यात बसविले ३,६०० मीटर, गुन्हे दाखल नाहीत, मात्र नोटीस बजावण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT