कोकण

नव्या स्वरूपात वाचनालय सज्ज होणार

CD

नव्या स्वरूपात ‘नगर वाचनालय’ सज्ज होणार
अॅड. दीपक पटवर्धन ः पुस्तकांना बार कोड, वाचकांना पुस्तक निवडीचे स्वातंत्र्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : द्विशतकाकडे वाटचाल करणारे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय नव्याने सज्ज होत आहे. २ ऑक्टोबर विजयादशमी ते दीपावली पाडवा या दरम्यान वाचनमंदिर नवे रूप घेऊन आपले काम सुरू करेल. नव्या स्वरूपात ग्रंथमांडणी करण्याचा प्रयत्न आहे. पुस्तकांना बार कोडिंग करण्याचा प्रकल्प हाती घ्यायचा आहे. वाचकांची वाचनसाधना, वाचनदर्जा अभ्यासून निवडक वाचकांना ग्रंथदालनात थेट प्रवेश देऊन पुस्तक निवडीचं स्वातंत्र्य देण्यासाठी योजना तयार करत आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, प्रत्येक वाचकाला वाचनकक्षात शांतपणे बसून किमान ५०० पुस्तके हाताळता येतील, अशी आसनव्यवस्था पुस्तक मांडणी करण्यात येईल. नवी पुस्तक खरेदी करता येतील, असा एक कक्ष दर्शनी भागात ठेवावा, असाही विचार सुरू आहे. ज्ञानपीठ सन्मानप्राप्त काही लेखकांचे फोटो, माहिती आणि साहित्यकृतीसाठी विशेष मांडणी असावी, असा प्रयत्न आहे. नवीन ग्रंथ ठळकपणे दिसावेत, असा डिजिटल बोर्ड प्रस्तावित आहे. मराठी साहित्यविश्वाची शान ठरलेल्या ग्रंथकृती विशेष मांडणी करून या अजरामर साहित्यकृतींचा सन्मान केला जाईल. अॅड. पटवर्धन म्हणाले की, स्वा. सावरकर यांचे आणि त्यांच्याविषयीचे साहित्य याचे दालन असावे तसेच पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचे साहित्यदालन होण्याकरिता प्रयत्न आहे. बालवाचकांसाठी स्वतंत्र दालन अशी वैविध्यपूर्ण मांडणी नवीन संचात होईल.

चौकट
ग्रंथसंपदा दोन लाखांवर नेणार
ग्रंथालयात १ लाख १५ हजारांची ग्रंथसंपदा असून, ती दोन लाखांवर नेण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. ई-रीडिंगसाठी व्यवस्था वाचनालयात उपलब्ध केली जाईल. अशा अनेक सुविधा संकल्पना राबवत रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय नव्या रूपात अद्ययावत स्वरूपात चालू करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! निवडणूक आयोगाविरोधात विरोधक मैदानात उतरणार, १ नोव्हेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन, ठाकरे बंधू राहणार उपस्थित

Rohit Sharma ने वडापाव सोडला, तीन महिन्यांची न थकता ट्रेनिंग! ११ किलो वजन कमी करण्यामागचं गुपित अभिषेक नायरने उलगडलं

Crime News : किरकोळ वादातून चाकू हल्ला आणि खून! फरारी आरोपी राजूचा ११ वर्षांपूर्वीचा थरार; संजय पिसेंची यशस्वी उकल

Nashik Crime : ५० लाखांची लाच मागितली! नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधीक्षकाला सीबीआय कडून अटक, तात्काळ निलंबित

Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी... प्रियजनांना पाठवा लक्ष्मीपूजनाच्या मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

SCROLL FOR NEXT