कोकण

शेती पिकू दे, शासनाच्या योजना पोहोचू दे

CD

-rat४p२८.jpg-
२५N८९४६३
रत्नागिरी : टिळक आळीच्या शताब्दी वर्षातील गणरायाचे गुरुवारी भाजपा नेते विशाल परब यांनी दर्शन घेतले. त्यांचे स्वागत करताना मंदार गाडगीळ, प्रभाकर करमरकर, सचिन करमरकर, राजू भाटलेकर, संकेत बापट आदी.
------
शेतकऱ्यांच्या शेतात चांगले पीक येऊ दे
विशाल परब ः सार्वजनिक गणपतींचे घेतले दर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरीचे भूषण समजले जाणारे टिळक आळीतल्या गणेशोत्सव मंडळाला भाजपचा कार्यकर्ता म्हणून आज दर्शन घेतले. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गणेशाचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले. शेतकऱ्यांच्या शेतात चांगले पीक होऊ दे आणि शासनाच्या योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचू दे, गणरायाकडे प्रार्थना केली आहे, अशी माहिती सावंतवाडीतील भाजप नेते विशाल परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजप नेते परब यांनी आज रत्नागिरीत गणरायाचे दर्शन घेतले. टिळक आळीचा शताब्दी गणेशोत्सव आहे त्याबद्दल त्यांनी ट्रस्टी मंडळींचे विशेष अभिनंदन केले. तसेच पारावर १०६ वर्षे दर शनिवारी चालणाऱ्या भजनाबद्दलही खूप चांगली प्रथा, परंपरा चालू ठेवल्याबद्दल अभिनंदन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी प्रश्न विचारला असता जागरुक नागरिक मतदान करतात आणि त्यांना योग्य पक्ष वाटतो तिथे ते मतदान करत असतात. मात्र आजचा दिवस गणपतीचा आहे. त्यामुळे राजकारणावर बोलत नाही. नंतर भेटीगाठी घेईन, असे परब यांनी स्पष्ट केले. यानंतर परब यांनी रत्नागिरीचा राजा, श्री रत्नागिरीचा राजा, ओम साई मित्रमंडळ गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटचे विशाल परब यांनी रत्नागिरीत परत येऊन मान्यवरांच्या भेटी घेईन, असे सुतोवाचही याप्रसंगी केले. या वेळी अॅड. अनिल निरवडेकर, मंडळाचे प्रभाकर करमरकर (ट्रस्टी), संजय तेरेदेसाई, सचिन करमरकर, संकेत बापट, पराग मुळ्ये यांच्यासमवेत भाजपचे राजू भाटलेकर, श्री. सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT