काही सुखद--------लोगो
-rat५p१२.jpg-
P२५N८९६६४
राजापूर ः प्रथमेश वालम यांनी सर केलेला खडा पारसी सुळका.
-rat५p१३.jpg ः
२५N८९६६५
खडा पारसी सुळका सर करताना प्रथमेश वालम.
----
प्रथमेश वालम यांच्याकडून २०० गडकिल्ले सर
प्रतिकूल परिस्थितीशी झुंज ; किल्ल्यांबाबत जनजागृती अन् स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ ः रखरखते ऊन, वेगाने वाहणारा वारा, त्यातून निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीशी झुंजत जमिनीपासून सुमारे साडेचारशे फूट उंचीचे अन् सुळक्यासारखे उभे असलेले सुमारे दोनशेहून अधिक गडकिल्ले तालुक्यातील पडवेचे सुपुत्र प्रथमेश वालम यांनी धाडसाने सर केले. मानसिक आणि शारीरिक क्षमतेची जणूकाही अग्नीपरीक्षा पाहणाऱ्या या मोहिमा प्रथमेश यांनी जिद्द आणि शारीरिक क्षमतेवरील दृढ विश्वासाच्या बळावर सर केल्या. त्यामुळे दुर्गवीर वालम यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या विविधांगी किल्ले शालेय जीवनामध्ये पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासल्याने त्यांच्याबाबत वालम यांना नेहमीच आकर्षण राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी आणि कार्यपद्धतीतून प्रेरित होऊन सह्याद्रीतील गडकोट व निसर्ग भटकंतीचे वेड लागल्याचे ते सांगतात. पुणे येथे नोकरी करत असतानाही त्यांनी गडकिल्ले सर करण्याचा छंद कायम जोपासताना त्यांनी दुर्गवीर प्रमोद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री, बागलाण आणि सातमाळ डोंगररांगेतील सुमारे दोनशेहून अधिक गडकिल्ले आजपर्यंत सर केले आहेत. त्यामध्ये जमिनीपासून सुमारे चारशे-साडेचारशे फूट उंचीचे आणि नव्वद अंश कोनामध्ये उभे असलेले सुळक्यांसह अनेक अवघड असलेल्या गडकिल्ल्यांचा समावेश आहे. सुमारे नव्वद अंश कोनामध्ये उभा असलेला आणि जमिनीपासून सुमारे साडेचारशे फूट उंच असलेला खडा पारसी सुळका सर करण्याची मोहीम प्रथमेश यांनी प्रतिकूल स्थितीशी दोन हात करत अवघ्या दीड तासामध्ये फत्ते केली आहे. यांसह किल्ले राजगड, दुर्ग तांदूळवाडी, लिंगाणा, मोरोशी भैरवगड, मलंगगड, तैलबैला, वजीर सुळका, शितकडा, वैराटगड, रांगणा, रोहिडेश्वर, सिद्धगड, गोरखगड, हरिहर, कोकणातील मनोहरगड, रांगण्या, मानगड, पाचाडकोट, कोकणदिवा आदी थरारक दुर्गही प्रथमेश वालम यांनी सर केले आहेत.
केवळ स्वतः गड सर न करता स्वतःसोबत इतरांनाही या मोहिमेमध्ये सहभागी होऊन दुर्गभेट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची अनुभूती घ्यावी म्हणून ते जनजागृती आणि प्रोत्साहन देत आहेत. गडावर गेल्यावर त्या ठिकाणी स्वच्छतामोहीम राबवून त्या द्वारे साऱ्यांना गडाची स्वच्छता आणि पावित्र्य राखण्याचा संदेश देतात. त्यांनी केलेल्या या दुर्गभ्रमंतीसाठी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळाच्यावतीने ९२व्या वर्धापनदिनानिमित्ताने वि. दा. सावरकर शौर्य पुरस्काराने रत्नागिरी येथे नुकतेच गौरवण्यात आले.
----
साहसाचे कौतुक
पाठ्यपुस्तकामधून अभ्यासलेल्या किल्ल्यांची प्रत्यक्षात अनुभूती घेण्याच्या दुर्गवीर प्रथमेश वालम यांच्या या साहसी अन् धाडसी वृत्तीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.