rat५p२२.jpg-
२५N८९६७४
खेड - परतीच्या प्रवासाला निघालेल्या कोकणवासियांची खेड रेल्वेस्थानकावर झालेली गर्दी.
परतीचा प्रवास गणेशभक्तांसाठी त्रासदायक
खेड रेल्वेस्थानक हाऊसफुल्ल; ‘सिंगल ट्रॅक’चा फटका
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : गणरायाला निरोप दिल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या गणेशभक्तांच्या रेल्वेप्रवासात रखडपट्टी आणि रेटारेटीचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. कोकण मार्गावरील सर्व रेल्वेस्थानके अक्षरशः हाऊसफुल्ल झाली असून, प्रचंड गर्दी हाताळण्यासाठी रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.
स्पेशल गाड्याही उशिराने सिंगल ट्रॅक आणि गणपती स्पेशलच्या वाढत्या फेऱ्यांमुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. पहिल्याच दिवशी मुंबई-ठोकूर गणपती स्पेशल तब्बल ५ तास उशिराने धावली तर अन्य १० गाड्यांच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला. गर्दीचा विस्फोट, प्रवाशांची चढाओढ, महामार्गावरील खड्डे टाळून गणेशभक्त रेल्वेप्रवासालाच प्राधान्य देत आहेत; मात्र, यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील प्रत्येक स्थानक गजबजून गेले आहे. गाड्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः चढाओढ सुरू असून, दरवाजेच उघडले जात नसल्याने तासनतास वाट पाहावी लागत आहे.
गर्दीमुळे गोंधळ वाढू नये यासाठी स्थानिक पोलिस रेल्वे पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या सहाय्याने प्रवाशांना गाड्यांमध्ये सुरक्षितपणे चढण्यास मदत मिळत आहे. कोकण रेल्वे प्रशासनही ध्वनिक्षेपकाद्वारे सतत सूचना देत प्रवाशांना सतर्क करत आहे. ‘सिंगल ट्रॅक’चा मोठा फटका बसला आहे. गाड्या क्रॉसिंगसाठी प्रचंड वेळ जात आहे. त्यामुळे गाड्यांना उशीर होत आहे. एकीकडे गर्दी आणि दुसरीकडे रेल्वेगाड्या उशिरा येत असल्याने गणेशभक्तांची परतीच्या प्रवासात चांगलीच रखडपट्टी होत आहे.
---
दृष्टिक्षेपात
* गणपती स्पेशल गाड्याही उशिराने
* रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांची कुमक तैनात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.