rat५p१९.jpg-
P२५N८९६७१
संगमेश्वर- पाच जाधव कुटुंबीयांनी एकत्र कुटुंबपद्धतीची तीन पिढ्यांपासून सुरू असलेली तब्बल १०९ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे.
-----
जाधव कुटुंबाची गणेशोत्सवाची १०९ वर्षांची परंपरा
कडवईत २१ दिवसांचा गणपती ; प्रबोधनासह मनोरंजन कार्यक्रम, एकत्र कुटुंबपद्धतीचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ ः आधुनिक काळातही समाजात एकत्र कुटुंबपद्धतीची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक उपक्रमांद्वारे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचा जागरदेखील सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील कडवई पाटीलवाडी येथील पाच जाधव कुटुंबीयांनी त्यांची एकत्र कुटुंबपद्धतीची तीन पिढ्यांपासून सुरू असलेली तब्बल १०९ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे.
समाजप्रबोधनासह विविध उपक्रम राबवत ते आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदा वेगळेपण जपणाऱ्या २१ दिवसांच्या त्यांच्या गणेशोत्सवात साडेचार फुटाची भव्य देखणी गणेशमूर्ती बसवण्यात आली आहे. ही मूर्ती सारेगम लिटल चॅम्पचे प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे यांच्या आरवली येथील कलाश्री गणेशमूर्ती केंद्रात साकारण्यात आली आहे. प्रत्येकवर्षी नावीन्यपूर्ण सजावट हे या गणरायाचे वैशिष्ट्य असते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव आणि कुटुंबीय त्यांच्या आजोबांपासून सुरू असलेली परंपरा जपत मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. पूर्वी त्यांचा गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत असायचा; मात्र २०१६ला त्यांच्या गणेशोत्सवाला १०० वर्ष पूर्ण झाल्याने या कुटुंबीयांनी वेगळेपण जपत २१ दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली.
या वेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी रात्री ११ वा. शाहीर रत्नाकर महाकाळ, पूनम आगरकर यांच्या शक्तीतुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव, कल्याण शिवसेना उपशहरप्रमुख विश्वनाथ जाधव, सूर्यकांत जाधव, प्रभाकर जाधव, माजी उपसरपंच संतोष जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र जाधव, जगन्नाथ जाधव, सचिन जाधव, शांताराम जाधव आदी मंडळी गणेशोत्सव काळात संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतात.
---
चौकट...
विविध कार्यक्रमांची मेजवानी
या दिवसात ते विविध प्रकारचे प्रबोधनात्मक धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे करतात. यंदा २१ दिवसांच्या गणपतीचे २३वे वर्ष असून, भजन, नृत्य, कलाविष्कार, कीर्तन यांसह २१ दिवसांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी गणपती उत्सवाच्या २१व्या दिवशी जाखडी नृत्य, शक्तीतुरा यांसह सत्कार, महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.