swt512.jpg
89746
विनायक जाधव, विलास फाले, उदय गवस, रामा पोळजी, बाबाजी भोई, संजय पाटील, दिनकर केळकर, चंद्रकांत कदम.
जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट
शिक्षक पुरस्कार जाहीर
लवकरच वितरणः २१ प्रस्तावांमधून ८ शिक्षकांची निवड
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील प्रत्येकी एक अशा आठ शिक्षकांची यासाठी निवड केली असून यांची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर उपस्थित होते.
यासाठी जिल्ह्यातून एकूण २१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यात देवगड २, दोडामार्ग २, कणकवली ४, कुडाळ ४, मालवण २, सावंतवाडी ३, वैभववाडी १ आणि वेंगुर्ला ३ अशा प्रस्तावांचा समावेश होता. दोन टप्प्यांत मुलाखती घेऊन शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यपद्धती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठीचे उपक्रम आणि शाळांतील शैक्षणिक उठावाचा विचार करून अंतिम आठ शिक्षकांची निवड करण्यात आली.
हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता आणि त्यास मंजुरी मिळाल्यानंतर आज घोषणा करण्यात आली. पुरस्कारप्राप्त शिक्षक ः कणकवली : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ चे शिक्षक विनायक जाधव, सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा मांडखोल नं. १ चे शिक्षक विलास फाले, दोडामार्ग : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळयेचे उपशिक्षक उदय गवस, वेंगुर्ला : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ कणकेवाडी नं. ३ चे उपशिक्षक रामा पोळजी, कुडाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, माणगावचे उपशिक्षक बाबाजी भोई, देवगड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिर्ये नं. १ चे उपशिक्षक संजय पाटील, वैभववाडी : पीएम श्री दत्त विद्या मंदिर, वैभववाडीचे उपशिक्षक दिनकर केळकर, मालवण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेरी मळाचे उपशिक्षक चंद्रकांत कदम.
दरम्यान, सर्वच प्रस्तावित शिक्षक उत्कृष्ट काम करणारे होते. त्यामुळे स्पर्धा निर्माण झाली होती. मात्र, शैक्षणिक कार्यात विशेष ठरलेल्या आठ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्रस्तावित सर्व शिक्षकांनी यापुढेही असेच कार्य सातत्याने करून विद्यार्थ्यांची सेवा करावी, असे आवाहन श्री. खेबुडकर यांनी यावेळी केले. लवकरच विशेष कार्यक्रम घेऊन या सर्व शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.