चिपळुणात ऑगस्टमध्ये पूर, तरी सरासरी कमी
गतवर्षीपेक्षा ३२८.०७ मिमी. कमी; २ सप्टेंबरला सारखा पाऊस
चिपळूण, ता. ५ ः ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात येथे मुसळधार पडलेल्या पावसाने शहरात पूर आणला; मात्र तरीही गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३२८.०७ मिमी. कमी पाऊस पडला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून, अधूनमधून किरकोळ सरी कोसळत आहेत.
यावर्षी मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला असला तरी जूनपासून सुरू झालेला नियमित पाऊस तितकासा कोसळला नव्हता. त्यामुळे यावर्षी पावसाचे काय होणार, असा प्रश्न उभा ठाकला असतानाच जुलै महिन्याच्या अखेरीपासून पावसाने जोर धरला. ऑगस्ट महिन्यात तो मुसळधार पडल्याने शहरात पूर आला. त्यामुळे व्यापारी व नागरिकांचे तितकेच नुकसान झाले नसले तरी ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे घरे, पडव्या, गोठे कोसळून मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले असले तरी नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही.
सुरुवातीला पावसाने मारलेल्या दडीमुळे सरासरी कमी झाली होती. ती मध्यंतरीच्या पावसाने बऱ्यापैकी रूळावर आली असली तरी गतवर्षीच्या २ सप्टेंबरपर्यंतच्या सरासरीपेक्षा ३२८.०७ मि.मी.ने कमी आहे. गतवर्षी २ सप्टेंबरपर्यंत ३७८१.६२ मिमी. तर यावर्षी या तारखेपर्यंत ३४५३.५५ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी २ सप्टेंबरला २१.२२ मिमी. तर यावर्षीही या तारखेला २१.२२ मि. मीटरच पाऊस पडला आहे. हा योगायोग घडला असून, सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.
े
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.