‘रोटरी’ चे
अथर्वशीर्ष पठण
खेड ः तालुक्यातील भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी खेडचा महाराजा या सार्वजनिक गणेशोत्सवात श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करत वातावरण भक्तिमय केले. चौदा विद्या व चौसष्ट कलेचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्याच्या उत्सवात यंदाही विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम राखली. विद्यार्थ्यांचे अचूक शब्दोच्चार आणि पठणाच्यावेळी आवाजातील लयबद्धता तसेच चढ-उतार यांनी सर्व भक्तगण श्री गणपती अथर्वशीर्ष श्रवणात मग्न झाले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुस्पष्ट अथर्वशीर्ष पठण केल्यामुळे उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कदम महाविद्यालयात
रेड रिबन क्लब
खेड ः भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक विलास म्हस्के यांनी रेड रिबन क्लब आणि एड्स रोगाविषयी माहिती दिली. दीपाली मोरे यांनी तरुण पिढीवर व्यसनाधीनतेचे होणारे परिणाम या विषयी माहिती दिली. या प्रसंगी संस्थाध्यक्ष भिकू गोवळकर, सचिव अॅड. तु. ल. डफळे, सहसचिव दत्तात्रय धुमक, खजिनदार राजाराम बैकर, सदस्य बाबाराम तळेकर, प्राचार्य विनोद साळुंखे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.