कोकण

पावसमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात

CD

पावसमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात
पावस ः पावसमध्ये ईद-ए-मिलाद जमातुल मुस्लिमिन दखनी मोहल्लातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त सजावट, विद्युत रोषणाई, मिरवणूक काढली. हजरत शेख महंमद पीरदर्गा ते काझी मोहल्ला, दखनी मोहल्ल्यातून मिरवणूक काढून जामा मस्जिद दखनी मोहल्लामध्ये ईद-ए-मिलाद कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वितेसाठी अध्यक्ष वसीम शौकत म्हालदार, रिजवान रोशनखान फडनाईक, दाऊद म्हामूद मुजावर, फैजल दाऊद झारी, ईकबाल अ. फडनाईक आदींनी परिश्रम घेतले.


90417
मुख्याध्यापक लेलेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील विश्वेश्वर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शरदचंद्र लेले सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांकडून त्यांचा गौरव करण्यात आला. शाळेच्या व लेले यांच्या ३४ वर्षांच्या वाटचालीवर भाष्य करणाऱ्‍या ‘किमयागार’ या गौरव विशेषांकाचे माजी आमदार बाळ माने, माजी शिक्षण सभापती उदय बने, शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी प्रकाश बिर्जे, यशवंत डोर्लेकर, रवींद्र बिर्जे आदींच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रशालेतून निवृत्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्‍यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT