kan101.jpg
90546
कणकवली ः येथील प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
कुणालाही तुरुंगात टाकणारा
जनसुरक्षा कायदा रद्द करा
ठाकरे शिवसेनेची प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
कणकवली, ता. १० ः सरकारला वाटले, तर ते कुणाही व्यक्तीला जेलमध्ये टाकू शकते, असा जनसुरक्षा कायदा राज्य सरकारने आणला आहे. या कायदा लागू झाला, तर सुरक्षेच्या नावाखाली सरकार कुणावरही कारवाई करू शकते. त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द व्हायलाच हवा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे करण्यात आली.
जनसुरक्षा कायदा विरोधात आज ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. त्यानंतर याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना देण्यात आले. यावेळी सुशांत नाईक म्हणाले की, जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सरकार हुकूमशाही आणू पाहत आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे.
दरम्यान, संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी प्रांताधिकाऱ्याना निवेदन दिले. यावेळी सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रवींद्र जोगल, जयेश नर, मज्जीद बटवाले, राजू शेट्ये, राजू राणे, विलास गुडेकर, दादा सावंत, दीपक कदम, तेजस राणे, सिद्धेश राणे, वैभव मालंडकर, सी. आर. चव्हाण, अजय जाधव, किरण वर्दम, अजित काणेकर, मंगेश राणे, रिमेश चव्हाण, पराग म्हापसेकर, संजय सावंत, मंगेश फाटक, वीरेंद्र नाईक, समीर परब, प्रतीक्षा साटम, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.