-rat१०p२.jpg-
P२५N९०५३९
चंदन बसणकर
बसणी तंटामुक्ती
अध्यक्षपदी बसणकर
रत्नागिरी ः शहरानजीकच्या बसणी ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंदन बसणकर यांची सलग चौथ्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या चांगल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ग्रामसभेने एकमताने ही निवड केली. ग्रामसभेला सरपंच समृद्धी मयेकर, उपसरपंच किशोर नेवरेकर, ग्रामपंचायत सदस्य सुमित राणे, बबन शिंदे, मानसी पाष्टे, पोलिस पाटील प्रिया बंदरकर आदी उपस्थित होते.
-rat१०p३.jpg-
२५N९०५४०
प्रतीक्षा बारस्कर-हिंदळेकर
प्रतीक्षा बारस्करांना
पी.एच.डी पदवी
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका प्रतीक्षा बारस्कर (हिंदळेकर) यांना विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयातील पीएचडी (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान केली आहे. प्रतीक्षा बारस्कर-हिंदळेकर यांनी ''रिमेव्हल ऑफ हेव्ही मेटल्स फ्रॉम इंडस्ट्रियल इनफ्ल्युन्ट युझिंग अॅग्रीकल्चर मटेरिअल व्हॅलिडेशन बाय इलेक्ट्रो अॅनिलिटिकल टेक्निक'' या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला होता. या कालावधीत त्यांनी तीन आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अभिनंदन केले आहे.
हेगशेट्ये महाविद्यालयात
आजपासून वक्तृत्व स्पर्धा
संगमेश्वर ः एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात (कै.) मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रंगणार आहे. १२ व १३ सप्टेंबरला होणाऱ्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १२ सप्टेंबरला जिल्हास्तरीय माध्यमिक गटाची आणि १३ सप्टेंबरला कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयीन गटांची वक्तृत्व स्पर्धा होईल. माध्यमिक गटासाठी विज्ञान कथाकार जयंत नारळीकर, जीएसटी : एक जिझिया, आम्ही तिसऱ्या महायुद्धाच्या क्षितिजावर, हिंदी सक्ती : गरज कोणाची?, समाजभान रत्न– रतन टाटा हे विषय असून, कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी अभिजात माय मराठी, भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक पत, ईव्हीएम : विश्वासार्हता आणि ४५ दिवस, खासगी क्लासेसचे आक्रमण, दानशूर भागोजी कीर हे विषय आहेत. राज्यस्तरीय वरिष्ठ गटासाठी बहुआयामी साहित्यिक– जयवंत दळवी, ट्रम्पशाही आणि जागतिक अर्थकारण, आणीबाणी : इतिहास आणि वर्तमान, अरण्यऋषी– मारुती चितमपल्ली, जातीय जनगणनेची अपरिहार्यता हे विषय आहेत. स्पर्धेबाबत माहितीसाठी प्रा. सचिन टेकळे यांच्याशी संपर्क साधावा.
तायक्वांदो स्पर्धेत
पैसाफंडचे यश
संगमेश्वर ः चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत संगमेश्वर येथील पैसाफंड इंग्लिश स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक केला. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचा आज व्यापारी पैसाफंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अजिंक्य शिंदे आणि प्रथमेश शेट्ये अशी त्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.