कोकण

पंधरा वर्षांच्या विश्वासार्हतेतून साधली प्रगती

CD

मालिकेचे नाव ः बलशाली नारीशक्ती

टुडे पान एक अँकर

तळवडेः भाग-३

swt1110.jpg
90801
तळवडे : आठवडा बैठकीत चर्चा करताना मानिनी स्वयंसहायता महिला समुहाच्या महिला.
swt1111.jpg
90802
तळवडेः एका प्रदर्शनात ‘मानिनी’ समुहाने लावलेला स्टॉल.

पंधरा वर्षांच्या विश्वासार्हतेतून साधली प्रगती
तळवडेतील गटः दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्रीतून आकारला व्यवसाय
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ः खाऊ, नियमित जेवणात लागणाऱ्या वस्तू उत्पादित करून त्या विक्री करणे तसेच कुक्कुटपालन आणि अंडी व्यवसायाच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील मानिनी महिला स्वयंसहायता समुहाने साधलेली प्रगती जिल्ह्यात लक्षवेधी ठरत आहे. गेली १५ वर्षे कार्यरत असलेल्या या समुहातील १० महिलांनी कठीण परिश्रमातून वर्षाला अडीच लाख रुपये नफा मिळविण्यास सुरुवात केली आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या सावंतवाडी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून तळवडे प्रभागातील तळवडे गावात मानिनी महिला स्वयंसहायता समूह कार्यरत आहे. उमेद अभियानाच्या नियमाप्रमाणे या समुहात ग्रामीण भागातील गरीब, गरजू महिलांचा यात समावेश आहे. तळवडे गावातील १० महिलांनी ६ जुलै २०१० ला स्थापना केलेल्या या समुहातील महिलांनी बचतीच्या माध्यमातून दशसूत्रीच्या आधारे वाटचाल केली सुरू ठेवली आहे.
हा समूह गेली १५ वर्षे नियमित कार्यरत असून समुहाची दर आठवड्याला बैठक होऊन व्यवसायाचे चिंतन होते. नफा-तोटा यावर चर्चा होऊन यापुढे कोणते धोरण राबवावे, याबाबत विचारांचे आदानप्रदान होते. समुहाने दोन वेळा बँक कर्ज उचल केली असून त्याची नियमित परतफेड केली आहे. समुहातील महिलांचा गावातील स्वच्छतेच्या कामात नेहमीच हातभार असतो. ग्रामसभेत सुध्दा हजेरी लावत त्या देशाच्या जागृत महिला असल्याचे दर्शवितात. शासनाच्या योजनांबाबत होणाऱ्या चर्चेत सहभाग घेतात. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित हिमोग्लोबिन तपासणी करत या महिलांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते.
समुहातील महिला लाडू, करंजी, चिवडा, बनविणे व विक्री करणे, मसाला तयार करणे आणि विक्री करणे, कडध्यान्य, तृणधान्य खरेदी करून विक्री करणे तसेच कुक्कुटपालन करणे, तयार होणारी कोंबडी विकणे, या कोंबड्या देणारी अंडी विक्री करणे, खाऊ, नियमित जेवणात वापरत येणाऱ्या वस्तूंची निर्मिती करणे किंवा खरेदी करून विक्री करणे या प्रकारचा व्यवसाय करतात. या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या व्यवसायात विश्वासार्हता निर्माण केली आहे.
गेल्या पंधरा वर्षांत आर्थिक वाटचाल करताना या समुहाने अंतर्गत कर्जावरील व्याज, व्यवसायातील नफा, शासकीय निधी यांच्या जोरावर पुढचे पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. समुहाला अभियानाकडून तीस हजार रुपये एवढा फिरता निधी मिळाला आहे. तसेच ३ लाख २० हजार एवढा समुदाय गुंतवणूक निधी मिळाला आहे. एकात्मिक शेती विकास प्रकल्पांतर्गत अंडी संकलन केंद्रासाठी ३० हजार रुपये मिळाले आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत ४० हजार रुपये मिळाले आहेत. याशिवाय ''वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर''मधून एक लाख ८० हजार रुपये एवढा निधी समुहाला मिळालेला आहे. समुहाने तयार केलेल्या खाद्यपदार्थ विक्रीपासून तसेच तृणधान्य, कडधान्य खरेदी-विक्रीतून आणि कुक्कुटपालन, अंडी खरेदी-विक्रीपासून दोन लाख ५० हजार रुपये एवढा नफा प्राप्त झालेला आहे. तालुका अभियान व्यवस्थापक स्वाती रेडकर आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुजाता परब, उपाध्यक्ष प्रमिला सावंत, सचिव काशिबाई कांडरकर व अन्य सात सदस्य हा महिला समूह यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी सचोटीने प्रयत्न करीत आहेत.

चौकट
१५ वर्षे यशस्वी वाटचाल
व्यवसायासाठी आवश्यक कच्चामाल हा स्थानिक बाजारपेठ व शेतकऱ्यांकडून हा समूह खरेदी करतो. उत्पादित होणाऱ्या मालाची विक्री गोवा (म्हापसा, पेडणे), होडावडा, बांदा, सावंतवाडी, शिरोडा यांसह स्थानिक बाजारपेठेमध्ये केली जाते. अशा पद्धतीने आर्थिक उलाढाल करत गेली १५ वर्षे समुहाने आपली घोडदौड कायम ठेवत यश संपादन केले आहे. या समुहाने आपली यशस्वी वाटचाल अशीच पुढे चालू ठेवावी व अधिकाधिक वेगळ्या उपक्रमांतून सामाजिक, आर्थिक बाजू बळकट करावी, अशीच अपेक्षा.

कोट
तळवडेसारख्या खेडेगावात विभक्त स्वरुपात आम्ही सर्व महिला राहत होतो. घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. एक दिवस सर्वजण एकत्र येऊन समूह स्थापन केला. उमेद अभियानाच्या ताईंनी येऊन अभियानाविषयी माहिती दिली. आम्ही दहा महिला एकत्र येऊन २५ रुपयेप्रमाणे आठवडी बचत जमा करू लागलो. आम्हाला फिरता निधी ३० हजार रुपये मिळाला. त्यातून व्यवसाय सुरू केले. हळूहळू प्रधानमंत्री अन्न सुरक्षा प्रक्रिया उद्योग योजनेतून ४० हजार रुपये, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक विकास प्रकल्प अंतर्गत १ लाख ८० हजार रुपये तसेच समुदाय गुंतवणूक निधी अंतर्गत ३ लाख ३० हजार रुपये, बँक कर्ज ७ लाख रुपये, अंडी संकलन केंद्रासाठी ३० हजार रुपये एवढा निधी आम्हाला उमेद अभियानाकडून मिळाला. त्यामुळे आमच्या व्यवसायाला हातभार लागला. आता आम्ही लाडू, करंजी, फराळ, धान्य खरेदी-विक्री, अंडी कलेक्शन, केक मेकिंग आदी व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून २ लाख ५० हजार रुपये एवढा नफा मिळालेला आहे. खरोखरच उमेद अभियान आले आणि आमच्या सर्व महिलांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले.
- सुजाता परब, अध्यक्षा, मानिनी महिला स्वयंसहायता समूह

चौकट
समुहाचे नाव :- मानिनी स्वयंसहायता महिला समूह
स्थापना :- ६ जुलै २०१०
सदस्य संख्या :- १०
प्रभाग :- तळवडे
गाव :- तळवडे
तालुका :- सावंतवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : राज्य सरकारच्या सेवा आणि योजना व्हॉट्सअपवर येणार - मुख्यमंत्री फडणवीस

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT