rat१२p१.jpg-
P२५N९०९८४
रत्नागिरी ः कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या पक्षाच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री नीतेश राणे. शेजारी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे आदी.
---
एकजुटीने रत्नागिरीचे वैभव मिळवा
नीतेश राणे ; कोतवडे गटातील भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे ग्रामविकासमंत्री, रत्नागिरीचे खासदार, भाजपचे राज्याचे प्रमुख आणि तुमचा संपर्कमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. इतके मोठे पाठबळ असताना विकासनिधी हक्काने मागा. आपली कामे भाजपकडूनच होतील हा विश्वास इथल्या जनतेला द्या. हा भाजपचा पारंपरिक मतदार संघ आहे. पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी इथून निवडून गेले आहेत. ते वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करा, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नीतेश राणे यांनी केले.
तालुक्यातील कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या पक्षाच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजप दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मंडल अधिकारी विवेक सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांच्यासह माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, सरचिटणीस उमेश देसाई, उमेश कुलकर्णी, उपस्थित होते.
पक्ष कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी मंदिर असते, इथे लोकांच्या अडचणी दूर केल्या जातील हा विश्वास मिळाला पाहिजे. कोतवडे हा भाजपचा पारंपरिक गट असून तो मजबूत करा. कोतवडे या पारंपरिक बालेकिल्ल्याचे वैभव असेच राहावे यासाठी तुमच्या पाठीशी असल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले.
---
चौकट
स्थानिक निष्ठावंत बाहेरच उभे
तालुक्यातील कोतवडे येथील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पक्षाचे जुने, निष्ठावान व ज्यांनी हा गट बांधला त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. ज्यांनी पक्ष बांधला ते व्यासपीठावर नसल्याची चर्चा पक्षीय वर्तुळात सुरू होती. कोतवडे जिल्हा परिषदेचे नेतृत्व केलेले माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, पंचायत समितीचे माजी उपसभापती किसन घाणेकर, धामणसेतील उमेश कुळकर्णी, स्थानिक पदाधिकारी प्रकाश वारेकर हे सर्व उपस्थित असूनही त्यांना मंचावर बोलावण्यात आले नव्हते. ते बाहेरच उभे होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.