कोकण

रत्नागिरी- स्त्री-पुरुष समानतेतूनच भारताची प्रगती होणार

CD

-rat१२p२०.jpg-
२५N९१०३४
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे शुक्रवारी उद्‍घाटन करताना रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या संचालिका चित्रा बुझरूक. सोबत शिल्पा पटवर्धन, डॉ. लीना बावडेकर, डॉ. सोनाली कदम आणि डॉ. मकरंद साखळकर. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
----
शिक्षण, समानता, सक्षमीकरणातून भारताची प्रगती
चित्रा बुझरूक ः महिलांना संधी द्या, त्या ताकद सिद्ध करतील
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : पुरुषांप्रमाणे महिलांना सुरुवातीच्या काळात समान संधी मिळणे अत्यावश्यक आहे; परंतु महिलांनी पुरुषांशी बरोबरी किंवा स्पर्धा करू नये. निसर्ग नियमाप्रमाणे दोघंही भिन्न आहेत; परंतु संधी मिळाल्यास स्त्री आपली ताकद दाखवून देते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आयोजित महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता, सक्षमीकरण या परिषदेतून नक्कीच सामाजिक बदल घडावा यातून भारताची प्रगती होणार आहे, असे प्रतिपादन रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या संचालिका चित्रा बुझरूक यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे दोनदिवसीय ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम- उषा) योजनेंतर्गत ही परिषद हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे परिषद सुरू आहे. मंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, डॉ. लीना बावडेकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, पी. एम. उषा समन्वयक व उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम उपस्थित होत्या.
बुझरूक यांनी सांगितले की, महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळले पाहिजे. चालणे, खेळ, धावणे, योगासने आवश्यक आहेत. आता तंत्रज्ञान, शिक्षणाचा वेळ वाढल्याने प्रत्येक दीड वर्षांत अनेक बदल होतात. त्यामुळे नवनवीन शिक्षण घेत राहायला हवं. शिक्षणाने आपली निर्णयक्षमता विकसित होते. स्वतः निर्णय घेऊन त्या निर्णयाची जबाबदारी घेणेही आवश्यक असते. नातेसंबंध तोडू नयेत जोडत राहावे. त्यामुळे कुटुंबव्यवस्था टिकली पाहिजे. आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.
पटवर्धन म्हणाल्या, भारतात सगळ्यात मोठी कुटुंबव्यवस्था आहे आणि त्याला आता तडा जाऊ नये. कारण, स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरक आपल्याला थोडा कमी समजायला लागलाय. शिक्षक, प्राध्यापकांनी ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. कोणीही महिला अधिकारी पदावर पोहोचले की, त्या खुर्चीत बसल्यानंतर तुम्हाला गोष्टी सिद्ध करून दाखवाव्या लागतात.
---
चौकट १
आज होणार समारोप
परिषदेच्या समारोपाप्रसंगी शनिवारी (ता. १३) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस संशोधक महिलांविषयक विविध प्रश्न आणि पैलूंवर भाष्य करणाऱ्या शोधनिबंधाचे सादरीकरण करणार आहेत. विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान, स्त्रीशिक्षण, समानता, त्यांचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर परिषदेत विचारमंथन होणार आहे. परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Phulambri Accident : कार-दुचाकीचा अपघात मुलाच्या डोळ्यासमोर बापाने सोडला जीव..! मुलगा थोडक्यात बचावला

Latest Marathi News Updates Live : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PAK vs OMN : पाकिस्तानच्या दुबळ्या ओमानविरुद्ध रडले, फलंदाजांनी माना टाकल्या; भारताविरुद्ध निघणार यांची हवा...

SCROLL FOR NEXT