-rat१२p१२.jpg-
२५N९१००१
चिपळूण ः सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना निवेदन देताना महालक्ष्मी मित्रमंडळाचे पदाधिकारी.
-----------
‘चिपळूण-गुहागर’वर गतिरोधक बसवा
चिपळूण : चिपळूण-गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी खेंड बायपास येथील महालक्ष्मी मित्रमंडळाने केली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन दिले आहे. या मागणीवर गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी येथील परिस्थितीची पाहणी करूनही गतिरोधक बसवण्याकडे दुर्लक्ष केले.