गोठोस येथे २४ पासून
जिल्हास्तर भजन स्पर्धा
सावंतवाडी ः श्री देवी भावई सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, गोठोस यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त २४ ते २६ सप्टेंबर कालावधीत येथील श्री देवी भावई मंदिरात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सांघिक प्रथम क्रमांकासाठी ४००१, द्वितीय ३००१, तृतीय २००१ तसेच एका संघाला उत्तेजनार्थ रुपये १००१ आणि कायमस्वरुपी चषक देण्यात येईल. या व्यतिरिक्त उत्कृष्ट गायक, हार्मोनियम वादक, पखवाज, तबला, झांज आणि कोरस यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला रुपये एक हजार मानधन, मंडळाकडून कायमस्वरुपी चषक व प्रमाणपत्र दिले जाईल. केवळ पहिल्या १२ संघांनाच स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक भजन मंडळांनी बुधवारपर्यंत (ता. १७) विलास गोठोस्कर यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विनायक बांदेकर यांनी केले आहे.
..................
वेंगुर्लेत २५ पासून
संगीत भजन स्पर्धा
वेंगुर्ले ः ठाकरे शिवसेनेच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त २५ व २६ सप्टेंबरला सुंदरभाटले येथील शिवसेना शाखा येथे (साईमंगल कार्यालयानजीक) खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी प्रथम ७००० व चषक, द्वितीय ५००० व चषक, तृतीय ३००० व चषक, तसेच उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी १५०० व चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट पखवाज, गायक, हार्मोनियम, कोरस, झांज वादक यांना प्रत्येकी ७०० रुपये व चषक अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी संदीप पेडणेकर, पंकज शिरसाट यांच्याजवळ नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १२ संघांना स्पर्धेत प्रवेश देण्यात येईल.
......................
निवृत्त कर्मचाऱ्यांची
सावंतवाडीत उद्या सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी, दोडामार्ग तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघ, सावंतवाडीची मासिक बैठक मंगळवारी (ता. १६) सकाळी १०.३० वाजता संघटनेच्या सद्गुरू अपार्टमेंट, सालईवाडा-सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. सभेस सर्व सदस्य, संचालक मंडळ, कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष पणदूरकर, सचिव संभाजी कांबळे यांनी केले आहे.
---
‘नाथपंथी’ समाजाची
पावशीत २८ ला सभा
कणकवली ः नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ, सिंधुदुर्गची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता पावशी येथील वाटवे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.