रत्नागिरीत गुरुवारी
रोजगार मेळावा
रत्नागिरी ः जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १८ सप्टेंबरला होणार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्दर्शन केंद्र जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे होणार आहे. रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी रोजगार विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे १८ सप्टेंबरला मुलाखतीसाठी स्वतःचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बसणी सोसायटीकडून
अंत्यसंस्कारासाठी मदत
रत्नागिरी ः तालुक्यातील बसणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्या आशा गणपत कदम यांचे नुकतेच निधन झाले. यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बसणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन जयवंत बापूराव कदम व सदस्या प्रिया प्रशांत बंदरकर (मिनल) यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. त्याबद्दल दिवंगत आशा कदम यांचे चिरंजीव मंगेश कदम यांना कृतज्ञता व्यक्त करून धन्यवाद दिले. बसणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या या सेवाभावी कार्याबद्दल संपूर्ण बसणी परिसरातील ग्रामस्थांमधून विशेष कौतुक होत आहे.