सहर्ष टोकले बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. १५ ः रत्नागिरीतील शिर्के हायस्कूल येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दापोली तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूलच्या सहर्ष टोकले याने प्रथम क्रमांक मिळवला. तो सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात ४५ विद्यार्थी सहभाग झालेले होते. एकूण सात फेऱ्या खेळवण्यात आल्या. त्यामध्ये बुटाला हायस्कूलच्या सहर्ष टोकले या विद्यार्थ्यांने सर्व फेऱ्यामध्ये जिंकल्या. तो सहावी मध्ये शिकत आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल प्राचार्या भक्ती सावंत, क्रीडा शिक्षक मकरंद गायकवाड, वर्गशिक्षक दीपक सूर्यवंशी यांच्यासह अन्य शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एन. वाय. पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मांडवकर ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.