कोकण

आरोही पालखडे हिला ३ सुवर्णपदकं

CD

- rat१६p८.jpg -
P२५N९१८३०
सावर्डे : आरोहीचे अभिनंदन करताना संचालक शांताराम खानविलकर, सुभाष मोहिरे, अन्वर मोडक, प्राचार्य राजेंद्र वारे व क्रीडाशिक्षक.

जलतरणमध्ये आरोही पालखडेचे यश
जिल्हास्तरीय स्पर्धा ; तीन सुवर्णपदकांची कमाई
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या विद्यमाने रत्नागिरीतील शासकीय जलतरण तलाव येथे नुकत्याच झालेल्या शालेय जलतरण १७ वर्षे वयोगटात खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत आरोही पालखडे हिने तीन सुवर्णपदके पटकावली. पालखडे ही सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने २०० मीटर फ्रीस्टाइल, ४०० मीटर फ्रीस्टाईल व ४०० मीटर मिडले क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकून उपस्थितांचे लक्ष वेधले.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तीव्र स्पर्धेतही आपल्या दमदार खेळाच्या बळावर आरोहीने सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक करत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. विभागस्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची नामी संधी यामुळे सह्याद्री शिक्षणसंस्थेला प्राप्त झाली आहे. आरोहीच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, विद्यालय व्यवस्थापन समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सुभाष मोहिरे, अन्वर मोडक, मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी तिचे अभिनंदन करून केले आहे. तिला प्रशिक्षक विनायक पवार, दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे व प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Retentions: धोनी खेळणार! CSK ने ऋतुराज, ब्रेव्हिससह 'या' खेळाडूंना केलं रिटेन; 'बेबी मलिंगा' संघातून बाहेर

Yeola Municipal Election : येवला नगरपरिषद निवडणुकीत सस्पेन्स कायम; नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेत रस्सीखेच!

Numerology News: जोडीदारासाठी काहीही...! 'या' तारखेला जन्मलेले लोक निष्ठावंत असतात; प्रेमात कधीच धोका देत नाहीत

Nashik News : बिबट्यासोबत कोल्ह्याची भर; टाके देवगाव-वावीहर्ष परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्याने तिघे जखमी!

Solapur Election News: महाआघाडीचे आमदार-खासदार करणार लोकसभा, विधानसभेतील मदतीची परतफेड

SCROLL FOR NEXT