चिपळूणमधील डॉक्टरांचा
आज एकदिवसीय संप
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्ये विभागाने सीसीएमपी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यास मान्यता दिली आहे. त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे. या विषयी दाद मागण्यासाठी १८ रोजी सकाळी ८ ते १९ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा बंद आंदोलन पुकारले आहे. कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती आयएमए चिपळूणचे अध्यक्ष डॉ. अब्बास जबले यांनी दिली.
चिपळूण शहरातील सावरकर सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. अरविंद पोतदार, डॉ. गणेश जोशी, डॉ. वनिता सानप, डॉ. मनीषा वाघमारे उपस्थित होत्या. आंदोलनाची माहिती देताना डॉ. जबले म्हणाले, सीसीएमपी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करून घेण्यासाठीचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. हा निर्णय आरोग्यसेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा आहे. आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस व त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे. सीसीएमपी हा फक्त ओरिएंटेशन स्वरूपाचा कोर्स असून, त्याद्वारे अॅलोपॅथीचे परवाने देणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे. जगभरात एमबीबीएस हा एकमेव मान्यताप्राप्त मानक अभ्यासक्रम मानला जातो. सीसीएमपी आधारित नोंदणीमुळे राज्याच्या वैद्यकीय शिक्षणाचा व आरोग्यसेवेचा आंतरराष्ट्रीय दर्जा घटण्याची शक्यता आहे. एमएमसीमध्ये होमिओपॅथीला मार्ग खुला झाल्यास इतर पर्यायी पदवीधरांनाही अशाच मागण्या करण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्थेत गोंधळ निर्माण होईल व जनतेचा विश्वास कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.