कोकण

एका रात्रीत दोन सापांना मिळाले जीवदान

CD

बोरघर, चिंचघरला रात्रीत
दोन अजगरांना जीवदान
खेड, ता. १७ : तालुक्यातील बोरघर-मोहल्ला व चिंचघर-प्रभूवाडी या दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच रात्री दोन अजस्त्र अजगर दिसले. नागरिकांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे व वन विभागासह छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या सदस्यांच्या तत्परतेमुळे दोन्ही अजगरांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
बोरघर येथे १५ सप्टेंबरला रात्री सुमारे आठच्या सुमारास तब्बल नऊ फूट लांबीचा अजगर आढळला. स्थानिकांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. पथकाने सावधगिरी बाळगून अजगराला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. याच घटनेनंतर अवघ्या काही तासांत मध्यरात्री चिंचघर-प्रभूवाडी येथे दहा फूट लांबीचा अजगर दिसला. पुन्हा एकदा वनविभागाचे पथक व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. दोन्ही अजगरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. मोहिमेत छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनचे सर्वेश पवार, श्वेत चोगले, रोहन खेडेकर, सूरज जाधव व सुमित म्हाप्रळकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांना वन विभागाचे अधिकारी वनपाल उदय भागवत, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे व अशोक ढाकणे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT