-Rat१७p२५.jpg-
२५N९२२३४
पाले : ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन थेट प्रेक्षपणाद्वारे ऐकताना ग्रामस्थ, महिला.
---
‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; ग्रामसभेत उमटले समाधानाचे भाव
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.१८ ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर आश्वासक केलेल्या वक्तव्याने ग्रामपंचायतींमध्ये थेट प्रेक्षपण पाहणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर नकळत आनंदमयी हसू फुलल्याचे चित्र ग्रामसभेत पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मंडणगड तालुक्यात ग्रामसभांचे आयोजन करून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या ग्रामसभांना गावागावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजल्यापासून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभियानाचे प्रेक्षपण थेट दाखवण्यात आले. बोलत असताना त्यांनी लाडक्या बहिणींचा उल्लेख करत त्यांना अधिक स्वावलंबी करण्याच्यादृष्टीने एक लाखांचे अर्थसाहाय्य करणारी लखपती दीदी या योजनेच्या घोषणा करत त्यावर भाष्य केले. तसेच दरमहिना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे दीड हजार रुपये सुरू राहणार असून, योजना बंद होणार नाही असे सांगताच उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आनंदमयी भाव आले.
यानंतर ग्रामसभेमध्ये पाणंद रस्ते या पहिल्या टप्प्यातील उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. गावरस्ते, शेतमार्ग, पायवाटा, स्मशानभूमीकडे गावातील विहिरी, पाणवटे व देवालये यांच्याकडे जाणारे रस्ते यांची नोंद घेण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत भिंगळोली येथे झालेल्या ग्रामसभेस जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लिनाथ कांबळे उपस्थित होते.