भूसंपादन मोबदलासाठी
विशेष कॅम्पचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी ः छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध भूसंपादन प्रस्तावांमधील अद्याप मोबदला न स्विकारलेल्या खातेदारांना रक्कम अदा करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे, अशी माहिती भूसंपादन उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी दिली. कॅम्पचे वेळापत्रक ः प्रस्ताव क्र. ११/२००६ (घोटगे, सोनवडे-मठ-कुडाळ-पणदूर घोटगे-गारगोटी रा. म. १२० घाट रस्ता) २६ ला सकाळी ११ ते १-ग्रामपंचायत कार्यालय घोटगे. प्रस्ताव क्र. ६/२००९ (सोनवडे ता. कणकवली)-२६ ला दुपारी ३ ते ५–ग्रामपंचायत कार्यालय सोनवडे. प्रस्ताव क्र. ६०१/३/१२ (करुळ लघुपाटबंधारे धरण बुडीत क्षेत्र, सांडवा व पुच्छ कालवा)–२९ ला सकाळी ११ ते १–ग्रामपंचायत कार्यालय करुळ. प्रस्ताव क्र. १५/०४ (शिरशिंगे, शिवापूर-शिरशिंगे रस्ता बांधकाम)–१ ऑक्टोबरला सकाळी ११ ते १–ग्रामपंचायत कार्यालय शिरशिंगे. मोबदला न स्विकारलेल्या खातेदारांची यादी तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह नमूद दिवशी व वेळेत हजेरी लावून मोबदला स्विकारावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे ः रेशनकार्ड प्रत, खातेदाराचा १ फोटो, ओळखपत्र (निवडणूक ओळखपत्र / पॅनकार्ड / आधारकार्ड),
राष्ट्रीयकृत बँक पासबुक प्रत / रह झालेला धनादेश, बोजा विरहित अद्यावत सातबारा (बोजा असल्यास नाहरकत दाखला), खातेदार मयत असल्यास वारस हक्काचा पुरावा, १८ वर्षाखालील असल्यास पालकत्व दाखला (सरपंच प्रमाणित), विवाहित महिलेसाठी नाव बदलाचा पुरावा (विवाहनोंदणी दाखला / लग्नपत्रिका / राजपत्र).
------------------
बौद्ध समाज बांधवांची
आज कणकवलीत सभा
तळेरे ः जिल्ह्यातील बौद्ध समाजाने २०२४ मध्ये स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता.२०) दुपारी २.३० वाजता भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे होणार आहे. सभेचे अध्यक्षपद अरविंद वळंजू यांनी सांभाळले असून, संस्थेच्या पहिल्या वर्षातील आर्थिक कामकाजाचा लेखा-जोगा अहवाल सभासदांसमोर सादर केला जाणार आहे. संस्थेचे सचिव सुनील कदम यांनी सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पहिल्या सभा असल्यामुळे बौद्ध समाजात उत्सुकता आणि आनंदी वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.