कोकण

परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाला हातभार लावा

CD

rat२०p१.jpg-
P25N92791
रत्नागिरी-भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छता मोहिमेप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह. सोबत अन्य मान्यवर.
rat२०p२.jpg-
25N92792
किनाऱ्याची स्वच्छता करताना अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आदी.
----
सेवापर्व २०२५...लोगो

पर्यावरणाच्या रक्षणासाठी परिसर स्वच्छ ठेवा
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह ः भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छतामोहीम, विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : सेवापर्व २०२५ अंतर्गत जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस विभाग, नगरपालिका, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स, गद्रे मरिन, पटवर्धन हायस्कूल, रा. भा. शिर्के प्रशाला स्काऊट विद्यार्थी आदींच्या संयुक्त विद्यमाने भाट्ये समुद्रकिनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाला हातभार लावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
भाट्ये येथील समुद्रकिनारा आज स्वच्छ करण्यात आला. या वेळी केंद्रीय वन व वातावरणीय बदल विभाग मंत्रालयाचे अप्पर सचिव सत्यप्रकाश, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी उत्तम माने, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, मुख्याधिकारी वैभव गारवे, सरपंच प्रीती भाटकर, फिनोलेक्सचे नरेश खरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, आपण आज सोशल मीडियावर पाहिलं तर एक नवी समस्या दिसत आहे. समुद्रतळाशी असणारे जीव वर येत आहेत. त्याचे कारण म्हणजे प्रदूषण होय. समुद्र, नदी, जलस्रोत या सर्व ठिकाणी आज आपण प्रदूषण करतोय. त्याची स्वच्छता करणे, हे प्रदूषण रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता स्वत:पासून, आपल्या घरापासून करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून ‘एकल प्लास्टिक वापरू नका, एकच ध्यास ठेवूया. प्लास्टिक पिशवी हटवू, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करूया. वापर टाळूया प्लास्टिकचा जागर करूया, पर्यावरणाचा’ असा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचे प्रकाशन आणि वितरण या वेळी करण्यात आले. पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी या वेळी पथनाट्ये सादर करून पर्यावरण राखण्याचा संदेश दिला.
मी माझा समुद्रकिनारा वाचवत आहे. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, समुद्रकिनाऱ्यावर कोणताही कचरा न टाकता अस्तित्वातील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवेन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, समुद्री जीवसृष्टीवर प्लास्टिकच्या अपायकारक परिणामांविषयी जनजागृती करेन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न करेन. एक पेड माँ के नाम प्लान्ट फॉर मदर अभियानांतर्गत मी माझ्या मातोश्रींच्या नावाने व धरणीमातेच्या सन्मानार्थ एक वृक्षारोपण करेन. मी शपथपूर्व प्रतिज्ञा करतो की, पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा सराव व प्रसार करून मातृभूमीची रक्षा करण्यात हातभार लावेन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, निसर्गाशी सुसंवाद जीवन जगेन, अशी स्वच्छतेची शपथ सर्वांनी घेतली. या वेळी नारळाचे वृक्षारोपण करण्यात आले. प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा कोषाधिकारी प्रविंद बिराजदार आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस जवान आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council: सणासुदीला नागरिकांना दिलासा! जीएसटी कपात जाहीर, २२ सप्टेंबरपासून 'इतका' कर आकारला जाणार

INDW vs AUSW: स्मृती मानधनाने झळकावले वेगवान शतक, ऑस्ट्रेलियाच्या ४०० पार धावांसमोर जिद्दीने उभी राहिली; १४ चौकार, ४ षटकारांची आतषबाजी

Latest Marathi News Live Update : जोगेश्वरी स्पोर्ट्स क्लब येथे विभाग निहाय पदाधिकारी यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करत आहेत

Yogi Adityanath warning : दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार प्रकरण; आता खुद्द मुख्यमंत्री योगींनी दिलाय कडक इशारा!

Thane Crime: ...माझ्या सोबत येतेस का! मार्केटमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य, जमावानं मद्यपीला शिकवला धडा!

SCROLL FOR NEXT