कोकण

कलाशिक्षक टी. एस. पाटीलना आदर्श शिक्षक पुरस्कार

CD

- ratchl२०१.jpg-
P२५N९२८४३
टी. एस. पाटील

टी. एस. पाटील यांना
आदर्श शिक्षक पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः सह्याद्री शिक्षणसंस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिंचघरी सती विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक तुकाराम पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवारी (ता. २२) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
राज्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. पाटील हे विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्यांनी विद्यार्थीवाढीसाठी केलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक उठाव, विविध नवोपक्रम, मासिकातील लेखन, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून केलेले काम, त्यांना मिळालेली यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे बालभारती येथे कार्यानुभव समिती सदस्य म्हणून करत असलेले काम, बाहुलीनाट्यातून आनंददायी शिक्षण यांसह विविध उपक्रम राबवले आहेत. या निवडीबद्दल आमदार शेखर निकम, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, मुख्याध्यापक संजय वरेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

H-1B Visa: ट्रम्प यांच्या 'व्हिसा'प्रकरणावर भारताची पहिली प्रतिक्रिया; ‘कुटुंबांसाठी हे एक संकट...’

Karad News : प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारकडे केली महत्वाची मागणी, म्हणाले...

SCROLL FOR NEXT