कोकण

रेडीत उद्योग आणण्यासाठी समिती

CD

swt2422.jpg
93964
रेडीः येथे श्री माऊली विद्यामंदिरच्या नुतन इमारतीचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले.

रेडीत उद्योग आणण्यासाठी समिती
मनिष दळवीः वरिष्ठ पातळीवर प्रयत्नांची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ः सध्याचे युग हे संगणकीय आणि स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकायचे असेल तर दर्जेदार शिक्षणाबरोबर तांत्रिक व पर्यटनावर आधारित शिक्षण घेणे काळाजी गरज आहे. रेडी गावांतील छोटे मोठे उद्योजक, व्यावसायीक, विविध क्षेत्रातील नागरिक व सर्वपक्षिय एकत्र येऊन एक समिती तयार करू. वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून रेडी गावात उद्योगधंदे आणूया. त्यासाठी माझे सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे अभिवचन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी रेडी येथे दिले.
रेडी येथील श्री माऊली विद्यामंदिरच्या नविन इमारतीसाठी खासदार नारायण राणे यांनी खासदार फंडातून २५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या नुतन इमारतीचे उद्घाटन आज श्री. दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. संस्था व रेडी ग्रामपंचायतीतर्फे दळवींचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, पांडुरंग कौलापुरे, राजेंद्र कांबळी, प्रदिप प्रभू, सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच लक्ष्मीकांत भिसे, प्रितेश राऊळ, अजित सावंत, आरवली सरपंच समिर कांबळी, अनंत कांबळी, दिपक राणे, मुख्याध्यापक सी. एम. जाधव, सुविधा कांबळी, काका गवंडी, नमिता नागोळकर, दादा नाईक, भानुदास राणे, गोपाळ राऊळ उपस्थित होते.
रेडी गावात उषा ईस्पात, टाटा मेटालिक कंपनी बंद झाल्यानंतर येथील जमिनी आज ओस पडल्या आहेत. त्या जमिनीत रोजगार करणारे उद्योगधंदे निर्माण करून येथील बेकारी दूर करा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी दळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर रेडी गावांतील छोटे मोठे उद्योजक, व्यावसायीक, विविध क्षेत्रातील नागरिक व सर्व पक्षिय एकत्र येऊन एक समिती तयार करून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून रेडी गावात उद्योगधंदे आणूया. त्यासाठी माझे सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे अभिवचन श्री. दळवी यांनी दिले. तसेच नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे मोठे उद्योजक व्हा. रेडी गांवात दर्जेदार शिक्षणाबरोबर तांत्रिक व पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करणारे शिक्षण सुरू करून नव्या पिढीला दिशा देण्याचे कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रितेश राऊळ, अजित सावंत, सरपंच रामसिग राणे यांनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन राजेंद्र कांबळी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Video : धडाम्! भागो भागो...; नेमका स्फोट झाला तेव्हाचा व्हिडीओ आला समोर, काय घडलं?

Latest Marathi Breaking News : दिल्ली स्फोटातील गुन्हेगारांना सोडणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटात ४ डॉक्टरांचा हात, शकीलच्या अटकेमुळे उमर घाबरला अन् आत्मघातकी हल्ला घडवून आणला; नेमकं काय घडलं?

Twinkle Khanna Jealous of Men: 'या' कारणामुळे अक्षय कुमारची बायको पुरुषांवर जळते! बोलली अनेक बायकांच्या मनातील गोष्ट

Railway Ticket New Rule : रेल्वेचं तिकीट बुक करताय? मग 'हा' नवा नियम जाणून घ्याच..नाहीतर तुमच्या लहान मुलांना मिळणार नाही सीट

SCROLL FOR NEXT