-rat२७p१३.jpg-
२५N९४७६४
दापोली ः शालेय क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचा संघाला पारितोषिक प्रदान करताना मान्यवर.
--------
वराडकर महाविद्यालयाचा खो-खो मध्ये विजय
दापोली ः माटवण येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने खो-खोमध्ये विजेतेपद पटकावून जिल्हास्तरावर खेळण्याचा बहुमान मिळवला. अंतिम सामन्यात या संघाने ए. जी. हायस्कूलवर सहा गुणांनी मात केली. कर्णधार सुजल मोरेच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी खेळ दाखवला. आदित्य महाडिक, युवराज पड्याळ, ओंकार बारे, विवेक पड्याळ, सोहम बाईत, श्रेयस भांबीड, राज शिगवण, पवन पवार, निखिल शिगवण, दर्शन वाडकर, तन्मय घडवले व आर्यन नाचरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
दापोलीत ३० ला महसूल लोकअदालत
दापोली ः सेवा पंधरवडा अभियानांतर्गत तहसील कार्यालयाच्या स्तरावर दाखल झालेली ७० ब कुळाची दावा प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ३० सप्टेंबरला महसूल लोकअदालत दापोली तहसील कार्यालयात सकाळी १०.३० वाजता होणार आहे. आपसातील तडजोडीनुसार किंवा सर्वसंमतीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी दाव्यातील सर्व पक्षकार यांनी आपल्या विधिज्ञांमार्फत २८ सप्टेंबरपर्यंत लिखित स्वरूपात निवेदन तहसील कार्यालयात सादर करावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना बोंबे यांनी केले आहे.
धोपावे येथे महिलांची आरोग्य तपासणी
गुहागर ः केंद्र व राज्यशासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या विशेष उपक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर धोपावे येथे झाले. शिबिर श्री कालिकामाता जनजागृती मंडळच्या नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी घेण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीची सुविधाही शिबिरात उपलब्ध होती.