कोकण

-कृषी समृद्ध योजनेतून मिळणार 74 कोटी

CD

कृषी समृद्ध योजनेतून मिळणार ७४ कोटी
प्रत्येक तालुक्यास कोट्यवधींचा निधी ; शेतकऱ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कृषी समृद्धी योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला ७४ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी १७ कोटी ६८ लाख निधीला मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्याला कोट्यवधींचा निधी प्राप्त होणार आहे.
कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे आणि पिकांमध्ये विविधता आणणे, या उद्देशाने कृषी समृद्धी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात दरवर्षी ५ हजार कोटींचा निधी मिळणार असून, पाच वर्षात २५ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या कृषी योजनांसाठी मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला यातील निधी मिळाल्यानंतर प्रत्येक कृषी सजातील सहाय्यक कृषी अधिकारी यांना जवळपास ५० लाखांचा निधी शेतकऱ्‍यांच्या कृषी योजनांसाठी दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर या योजनेची माहिती मिळणार आहे. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, त्यामध्ये ब्रशकटर, पॉवरटिलर, ट्रॅक्टर, फवारणी पंप मिळणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना या योजनांचा समावेश या योजनेत असणार आहे.

कोट
कृषी समृद्धी योजनेतून शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे. या योजनेत शेतकऱ्‍यांना ४० आणि महिला शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान असणार आहे. या योजनेतून चिपळूण तालुक्याला नक्की किती निधी प्राप्त होईल, हे अजून निश्चित नाही. ते जिल्हास्तरावर ठरेल. प्रशासकीय मंजुरीचा एक भाग असेल. जास्तीत जास्त निधी चिपळूणला प्राप्त व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न राहतील.
- शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy: विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी; दहापेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Rupali Chakankar Video : चारित्र्यावर टीका-टिप्पणी करणाऱ्यांना रूपाली चाकणकरांचं कडक शब्दांत उत्तर; जाणून घ्या, काय म्हणाल्या?

Ajit Pawar : अतिवृष्टीचा विचार करून आगामी गळीत हंगाम शुभारंभाचा निर्णय घेणार

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Vani Crime : पतीच्या त्रासामुळे माहेरी आलेल्या पत्नीस पतीनेच कातरीने वार करीत केली हत्या

SCROLL FOR NEXT