कोकण

‘एसपीके’तर्फे मालवणात उद्या स्वच्छता मोहीम

CD

‘एसपीके’तर्फे मालवणात
उद्या स्वच्छता मोहीम
सावंतवाडी, ता. २७ ः राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिनाचे औचित्य साधून येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातर्फे सोमवारी (ता. २९) सकाळी ८ वाजता मालवण दांडी समुद्रकिनारी ‘किनारे स्वच्छता अभियान’ आयोजित केले आहे. या अभियानाचे उद्‍घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज भोसले यांच्या हस्ते होणार आहे. उपक्रमात महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसी विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक, तसेच मालवण नगरपरिषद, यूथ बीटस फॉर क्लायमेट (मालवण), मेरीटाईम बोर्ड (मालवण), इकोमेट (मालवण), कांदळवन विभाग (मालवण), पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग आणि नीलकांती कृषी व मत्स्य पर्यटन (मालवण) यांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अभियानादरम्यान दांडी किनाऱ्यावरील कचरा संकलित करून त्याची वर्गवारी करण्यात येईल. तो कचरा मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे. उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.
....................
आंबा, काजू उत्पादकांची
वेंगुर्लेत मंगळवारी सभा
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू उत्पादक बागायतदार संघाची महत्त्वपूर्ण बैठक प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात मंगळवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसान भरपाईची विमा रक्कम अद्याप दिलेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक, बागायतदारांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे. याचे नियोजन करण्यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे ३० नोव्हेंबरपूर्वी विमा हप्ता रक्कम भरलेली आहे. त्यानंतर विपरित हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने ३० जुलैपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा विमा परतावा देणे गरजेचे होते. मात्र, विमा कंपनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. शेतकरी आधीच सततच्या नुकसानीमुळे हतबल झाला आहे. याबाबत जनआंदोलनाचे नियोजन या बैठकीत करण्यात येईल, असे जयप्रकाश चमणकर यांनी कळविले आहे.
-------
रेवतळे, धुरीवाड्यात
मोफत नेत्र चिकित्सा
मालवण ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध सेवा उपक्रम सर्वत्र राबवण्यात आले. मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या माध्यमातून धुरीवाडा, रेवतळे प्रभागातील नेत्र रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गेली १८ वर्षे मंदार केणी नागरिकांच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून अशाप्रकारे अनेक सेवा अविरत देत आहेत. सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होत असतात.

Rupali Chakankar Video : चारित्र्यावर टीका-टिप्पणी करणाऱ्यांना रूपाली चाकणकरांचं कडक शब्दांत उत्तर; जाणून घ्या, काय म्हणाल्या?

Ajit Pawar : अतिवृष्टीचा विचार करून आगामी गळीत हंगाम शुभारंभाचा निर्णय घेणार

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Vani Crime : पतीच्या त्रासामुळे माहेरी आलेल्या पत्नीस पतीनेच कातरीने वार करीत केली हत्या

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT