दिव्यांग तक्रार निवारण
समितीची उद्या बैठक
कणकवली ः दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ मधील कलम २३ अन्वये जिल्हास्तरावरील दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक सोमवारी (ता. २९) दुपारी १२ वाजता येथील पंचायत समितीमध्ये आयोजित केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तथा समितीचे सदस्य-सचिव, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या पत्रानुसार ही बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. दिव्यांग लाभार्थींच्या विविध तक्रारी व अडचणी ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाहीसाठी ही बैठक आयोजित केली असून कार्यक्षेत्रातील दिव्यांग लाभार्थींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून समस्या मांडावी, असे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
......................
कणकवलीत आज
दशावतार नाटक
कणकवली ः कणकवली-मधलीवाडी येथील ओंकार मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त उद्या (ता. २८) रात्री ८ वाजता दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सत्यनारायण महापूजा होणार असून रात्री ८ वाजता राठवडे- सुतारवाडी येथील विठ्ठलादेवी दशावतार नाट्य मंडळाचे ‘असुर मर्दिनी चामुंडा देवी’ हे नाटक सादर होणार आहे.