94849
सावंतवाडीत रस्ता सुरक्षा नियमांचे धडे
सावंतवाडी, ता. २९ ः रस्ता अपघात प्रतिबंध आणि सुरक्षित वाहतूक या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यामध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक मितेश माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन, वाहन चालविताना आवश्यक खबरदारी, वाहतूक शिस्तीचे महत्त्व तसेच जबाबदार नागरिक म्हणून घ्यावयाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी परिवहन विभागाचे कर्मचारी लहू वाळके यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
....................
94850
मळेवाडमध्ये स्वच्छता स्पर्धांना प्रतिसाद
मळेवाड, ता. २९ ः सध्या राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू असून, या अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतींकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीने या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अभिनव ‘स्वच्छ वॉर्ड स्पर्धा’ आणि ‘स्वच्छ घर, स्वच्छ अंगण’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चार वॉर्डसाठी ‘स्वच्छ वॉर्ड’ स्पर्धा आयोजित केली आहे. गावामध्ये स्वच्छता व सुव्यवस्था टिकून राहावी आणि ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, या हेतूने ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला आहे. या स्पर्धेमुळे ग्रामस्थांनी आपल्या वॉर्डच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपले घर, अंगण तसेच संपूर्ण वॉर्ड स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा, असे आवाहन सरपंच मिलन पार्सेकर यांनी ग्रामस्थांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.