कोकण

सरळ सेवाअंतर्गत ११६ जणांना नियुक्ती

CD

सरळ सेवा अंतर्गत ११६ जणांची नियुक्ती
जिल्हाधिकारी सिंह ः रत्नागिरी जिल्हा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देणार पत्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : महाराष्ट्र शासन सेवा पंधरवडा अभियान राबवते, परंतु ही एक ‘अभियानात्मक’ मोहीम आहे, ज्या अंतर्गत विविध योजना आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. यातील सरळ सेवा भरती ही एक वेगळी प्रक्रिया आहे. ती शासनाच्या संबंधित विभागांच्या जाहिरातींमधून येते. गट- क व गट -ड संवर्गातील जिल्हा प्रशासनाने १०८ पद भरली तर अनुकंपातत्वावर ८ पदे भरण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
यातील पाच लोकांना लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. शासनाचा एक उपक्रम आहे, जो नागरिकांना सेवा पुरवण्यावर आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर केंद्रीत असतो.
या अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे, त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि प्रशासनासोबत संवाद साधणे यासारख्या कामांवर भर दिला जातो. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ आणि ‘सेवा पंधरवडा अभियान’ यांसारख्या मोहिम्यातून नागरिकांना सेवा देणे हा उद्देश असतो. सरळ सेवा भरती म्हणजे शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया. या भरती प्रक्रिया शासनाच्या अधिकृत वेबसाइट्सवर किंवा संबंधित विभागांच्या जाहिरातींमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ही प्रक्रिया राबवून विविध विभागातील रिक्त पदांवर सरळ सेवा अंतर्गत नियुक्त्या दिल्या आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ४६, जिल्हा पुरवठा विभागात २१, जिल्हा परिषद १०, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग १०, विद्युत निरक्षण विभाग २, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय ९, पोलिस अधीक्षक कार्यालय ६ आणि जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रामध्ये ४ अशा १०८ रिक्त जागा भरण्यात आल्या.
अनुकंपा तत्त्वावरही ८ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामध्ये गट -क मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात १, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात १, पोलिस विभागात १, पाटबंधारे विभागात १ तर गट - ड मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात १, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात १, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय १ आणि पाटबंधारे विभागात १ अशा ८ जागा भरण्यात आल्या. प्रातिनिधीक स्वरूपात यातील ५ जणांना मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT