कोकण

सावंतवाडी रोट्रॅक्टतर्फे ‘ओपन गरबा नाईट’

CD

सावंतवाडी रोट्रॅक्टतर्फे
‘ओपन गरबा नाईट’
सावंतवाडी ः येथील सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत आणि रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडीतर्फे भव्य ''ओपन गरबा नाईट''चे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम राणी पार्वतीदेवी प्रशालेच्या सभागृहामध्ये होणार आहे. हा सांस्कृतिक सोहळा २९ व ३० सप्टेंबरला रात्री होणार असून, यामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यंदाचा गरबा नाईट मोठ्या उत्साहात व जोशात साजरा होणार असून, सावंतवाडीतील तरुणाईने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.................
कट्टा येथे गुरुवारी
विद्यार्थी गुणगौरव
मसुरे ः भारतीय बौद्ध महासभा व महिला शाखा मालवण यांच्या वतीने गुरुवारी (ता. २) सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यंत डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोका विजयादशमी व विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
...................
पोईपला सोमवारी
डबलबारी भजन
मसुरे ः पोईप येथील आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ६ ऑक्टोबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ४ वाजता ग्रामस्थांची संयुक्त भजने, ६ वाजता श्री समर्थ समई नृत्य, खुडी (ता. देवगड), रात्री ८.३० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाट (बुवा हेमंत तेली) विरुद्ध श्री कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ कणकवली (सुजित परब) यांच्यात होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थांनी केले आहे.
.....................
बिबवणे येथे आज
सभागृह लोकार्पण
कुडाळ ः बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे येथे भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थसहाय्यित नूतन सभागृहाचे उद्‍घाटन उद्या (ता. २९) सकाळी ११ वाजता होणार आहे. सभागृहाचे उद्घाटन आयुर्विमा महामंडळाचे रिजनल मॅनेजर एन. एस. राधव यांच्या हस्ते होणार आहे. महामंडळाचे डिव्हि. मॅनेजर चंद्रप्रकाश पराते, मार्केटींग मॅनेजर अभय कुलकर्णी, सेल्स मॅनेजर गजानन कोषटवार आदींची उपस्थिती आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष राजाराम सावंत, पदाधिकारी, संचालक आणि मुख्याध्यापक बी. एन. पारधी यांनी केले आहे.
..................
भिरवंडेकर मराठा
समाजाचे आवाहन
कणकवली ः भिरवंडेकर मराठा समाज मुंबई या संस्थेचा दसरा मेळावा २ ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेचे ही आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शाहू महाराज सभागृह दादर येथे हा मेळावा २ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता होणारा असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष यशवंत सावंत यांच्या उपस्थितीत या मेळावा होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni on IPL 2027 : पुढे खेळायचं की नाही, डिसेंबरमध्ये निर्णय घेणार; महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केलं चित्र, तेव्हा असं नेमकं काय घडणार?

Crime News: दहा हजारांचे कर्ज, ७५ हजारांची मागणी; मायच्या काळजाचा तुकडा हरपला!

Bay of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाचे संकेत; राज्यात पावसाचा अलर्ट, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

New Zealand T20I Squad Update: सलग दोन पराभव अन् न्यूझीलंड संघात उलथापालथ; भारताला हरवण्यासाठी धडाधड निर्णय

Beed Crime : बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून १० लाखांची खंडणी; ७ जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT