कोकण

बहुपर्यायी कृषीपुरक व्यवसायाने झाली स्वयंसिद्धा

CD

नवदुर्गा-------लोगो

-rat२९p१४.jpg-
२५N९५२९५
प्रीती होडे
-rat२९p१५.jpg-
२५N९५२९६
अझोलाची शेती
-rat२९p१६.jpg-
२५N९५२९७
संकरित गायी
-----
बहुपर्यायी कृषिपूरक व्यवसायातून स्वयंसिद्धा
वेहेळेतील प्रीती होडे ; दुग्ध व्यवसायाला कोंबडीपालन, सेंद्रिय खताची निर्मितीची जोड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः तालुक्यातील वेहेळे येथील प्रीती होडे यांनी दुग्ध व्यवसायातील संधी ओळखून दुग्धव्यवसाय सुरू केला. सुरुवातीला एक नंतर ३ आणि पुढे १ संकरित गाईचे संगोपन करत उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण केले. त्याच्या जोडीलाच पोल्ट्री आणि सेंद्रिय खत निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. या उद्योगातून त्यांनी कुटुबांला समृद्धीकडे नेण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला आहे.
चिपळूण तालुक्यातील वेहेळे कदमवाडी येथील प्रीती होडे या उमेद अभियानात महिला बचतगटासाठी सीआरपी म्हणून काम करत आहेत. घरी शेती करत असल्याने त्यांच्याकडे घरच्या दुधासाठी एकच गाय होती; मात्र व्यवसाय म्हणून त्यांनी दुग्ध उत्पादनाला चालना देण्याचे ठरवले. महिला बचतगटाच्या मिळणाऱ्या निधीतून त्यांनी तीन संकरित गायी घेतल्या. त्यांचे चांगले संगोपन केल्यानंतर यात त्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उमेदमधून बँकेचे १० लाखांचे अर्थसहाय्य घेतले. यातून त्यांनी सात संकरित गायी खरेदी केल्या. गायींच्या निवासासाठी त्यांनी घराशेजारीच सुसज्ज असा गोठा उभारला. गायीसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची शेतात लागवड केली. सकस दूध मिळण्यासाठी अझोलाची लागवड केली. सध्या ७० ते ८० लिटर दुधाची दैनंदिन विक्री केली जाते. काही लिटर दूध घरगुती विक्रीसाठी तर काही लिटर वाशिष्ठी डेअरीला दिले जाते. याला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. क्रॉस असलेल्या १०० कोंबड्या खरेदी करून त्यांची चांगली निगा राखली. टप्प्याटप्प्याने त्यांची विक्री करत त्यात वाढ केली. दूध आणि अन्य वाहतुकीच्या साधनासाठी त्यांनी मोठी गाडी खरेदी केली. या गाडीच्या साह्याने दुधाची वाहतूक व अन्य माल वाहतूक केली जाते. एकास एक जोडधंदा करत त्यांनी पतीच्या मदतीने कुटुबांला चांगली आर्थिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे. या कामी त्यांना उमेद अभियानचे व्यवस्थापक अमोल काटकर यांचे मार्गदर्शन मिळाले. गायींच्या शेणाचा वापर करून त्यांनी सेंद्रिय खताचीदेखील निर्मिती केली आहे. या विविध व्यवसायासोबतच त्या नाचणी सत्व, बर्फी, चकली, शेवड, बिस्कीट, लाडू असे विविध पदार्थ तयार करून त्याची विक्रीदेखील करतात. त्यालाही ग्राहकांची चांगली मागणी आहे. त्यांनी कठीण परिस्थितीवर मात करताना गावातील व प्रभागातील महिलांना लखपती करण्यासाठी पुढाकार घेतला. गतवर्षी त्यांच्या प्रभागातील १००हून अधिक महिलांना लखपती होण्यासाठी पुढाकार घेऊन मदत केली आहे.
---
कोट
कृषिपूरक उद्योगात महिलांना व्यवसायाची चांगली संधी आहे. उमेद अभियानातून व्यवसायाला चालना देण्यासाठी कर्जदेखील मिळते; मात्र मेहनतीने व्यवसाय वाढवून कर्जाची परतफेड करण्याची तयारी देखील ठेवायली हवी. कष्टाने व्यवसाय केल्यास त्यात नक्कीच यश मिळते.
- प्रीती होडे, सीआरपी, वेहेळे ता. चिपळूण
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी जाहीर केले पॅकेज

SCROLL FOR NEXT