कोकण

सोलापुरातील पाकणी पूरग्रस्तांसाठी ट्रकभर मदत

CD

सोलापुरातील पाकणी पूरग्रस्तांसाठी मदत
चिपळूण तालुक्याचा पुढाकार ; आज ट्रक होणार रवाना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर भागातील पाकणी पूरग्रस्त गावात बाधित ५०० कुटुंबीयांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पहिल्या मदतीचा ट्रक मंगळवारी (ता. ३०) चिपळूणवासीयांच्या माध्यमातून सकाळी रवाना होणार आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या पुढाकाराने सर्व चिपळूण तालुकावासियांच्या सहकार्याने अवघ्या दीड दिवसांत जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या असून शहर परिसरासह तालुक्यातून मदत करण्यासाठी सहभाग घेतला.
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आदी परिसरात परतीच्या पावसाने त्या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. जुलै २०२१ मध्ये चिपळूणला देखील महाभयंकर पुराचा फटका बसला होता. त्यावेळी राज्यभरातून चिपळूणसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत आली होती. ही बाब लक्षात घेता दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्याबाबत चर्चा सुरू होती. मदतीत सुसूत्रता यावी यासाठी समाजमाध्यमांवर प्रांताधिकारी यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्‍यांना आवाहन करण्यात आले. त्यानुसार प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूरमधील पाकणी या गावातील साडेतिनशे बाधित कुटुंबांना कोणती मदत हवी आहे याबाबत माहिती घेतली. त्यानुसार कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहावर जीवनावश्यक वस्तूंची मदत एकत्र करून ती पाठविण्याबाबत नियोजन झाले. त्यासाठी प्रांताधिकारी लिगाडे यांनी शासकीय कर्मचाऱ्‍यांचे सहकार्य घेतले. प्रांताधिकारी यांनी नियोजन करून आवाहन केल्यानुसार अवघ्या दीड दिवसात कपड्यासह जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. या सर्व वस्तू मंगळवारी (ता. ३०) सकाळी पाकणी गावातील पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. कपडे धुण्याचा साबण ७०० नग, आंघोळीचा साबण १४०० नग, ३५०० किलो गहू, १७५० किलो तांदूळ, खोबरेल तेल ३५० नग, दंतमंजन, १४०० टूथब्रश, बिस्कीट ५ हजार रूपये, मच्छर अगरबत्ती ७००नग, लहान-मोठा बरमुडा पॅन्ट २५, टॉवेल १४०० नग, साडी ७० नग, लहान-मोठ्या ट्रॅक पॅन्ट ३५० आदी आवश्यक साहित्य जमा झाले असून ते मंगळवारी रवाना केले जाणार आहे.

चौकट
सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था
मदत करणाऱ्यांमध्ये लायन्स क्लब सावर्डे, कोकण बाजार चिपळूण, ओक पेढी चिपळूण, आदर्श वस्तू भांडार, साई प्रतिष्ठान खेर्डी, पंचायत समिती चिपळूण, न्यू मंगल स्टोअर चिपळूण, सौरभ कुलकर्णी, वडनाका येथील सार्वजनिक चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळ, शारदा साडी सेंटर, कविता हॅन्डलूम, जयंत साडी सेंटर, मेजर कलेक्शन, माजी सभापती पूजा निकम आदींच्या सहकार्याने ही मदत उपलब्ध करून दिली.
-----
(पोटात घ्यावी)
- ratchl२९१.jpg-
२५N९५४३२
चिपळूण ः चिपळूण तालुका ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली.
---
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा पुढाकार
चिपळूण ः चिपळूण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेकडून पूरग्रस्तांना सुमारे २०० ग्रामस्थांसाठी किट देण्यात आहे.
आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत देण्याची भूमिका चिपळूण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने घेतली. त्यानुसार कपडे, विविध प्रकारचे धान्य, चादर, टॉवेल आदी गरजेच्या वस्तू निश्चित करण्यात आल्या. यासाठी सर्वांनी वर्गणी गोळा केली. दरम्यान, पिंपळी खुर्द ग्रामपंचायतीने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीने पूरग्रस्तांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे ५० किट तयार करून ते आपत्तीग्रस्तांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

Career Horoscope 30th Sept: उद्या गजकेसरी राजयोग! मान-सन्मान आणि यशाची दारे उघडणार; 'या' राशींचे करिअर झेपावणार

Godavari River Flood : गोदामाय कोपली! गेवराईतील ३२ गावातील दोन हजारांहून अधिक कुटूंबियाचे स्थलांतर

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT