कोकण

‘पोषण माह’बाबत बांद्यात जागृती

CD

95946

‘पोषण माह’बाबत बांद्यात जागृती
बांदा ः सार्वजनिक नवरात्रोत्सव सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ बांदा येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बांदा विभागातर्फे पोषण माह निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यात शासनातर्फे १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत पोषण माह आयोजित केला आहे. बालकांमधील वाढता लठ्ठपणा, कुपोषण कमी करणे, वडिलांचा बालसंगोपनातील सहभाग वाढविणे, बालकांना आहार व आरोग्य विषयक योग्य सवयी लावणे याबाबत समाजात जागृती करणे, हा महत्त्वाचा उद्देश आहे. बांदा केंद्र क्र. १ मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जनजागृतीपर फुगडी व पथनाट्य सादर केले. यावेळी भाजपच्या सिंधुदुर्ग महिला जिल्ह्याध्यक्ष श्वेता कोरगावकर उपस्थित होत्या. पर्यवेक्षिका आर्यशीला देऊलकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास बांदा केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
..................
95945

निवजेत नुकसानग्रस्तांना भाजपकडून मदत
ओरोस ः चक्रीवादळामुळे निवजे (ता. कुडाळ) गावातील प्रसाद नामनाईक यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राजू राऊळ यांच्या गुरांचा गोठा व अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निवजे येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना भाजपतर्फे आर्थिक मदत दिली. दादा बेळणेकर, पप्या तवटे, भाई बेळणेकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पारकर, दिनेश जैतापकर, बुथ अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Auto Rickshaw Strike : राज्यात आज रिक्षांचा संप; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता

INDA vs PAKA सामन्यात राडे! वैभवला डिवचलं, हर्षित राणालाही आक्रमक सेंडऑफ, तर तिलकशीही पाकिस्तानी खेळाडू भिडले; Viral Video

Crop Insurance: रब्बीच्या सहा पिकांना विमा ,कांद्याला हेक्टरी ९५ हजार, ज्वारीला ३६ हजारांची भरपाई

Satara News: अजूनही कागदावरच ४० रुपयांत नाश्ता; एसटीच्‍या योजनेची सहा महिन्यांपूर्वी घोषणा; स्वच्छतागृहांचाही बोजवारा

Maharashtra Cold Wave : महाराष्ट्रात गुलाबी थंडीचा जोर वाढला; जळगावमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, पुढील ३ दिवस कसे राहणार हवामान?

SCROLL FOR NEXT