कोकण

पीक पाहणीसाठी ३१ पर्यंत मुदतवाढ

CD

पीक पाहणीसाठी ३१ पर्यंत मुदतवाढ
देवगड तहसीलदारः लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ ः शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीला आता महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ३१ ऑक्टोबरपर्यंत सहायक स्तरावरून उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे.
याबाबत महसूल विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार महसूल विभागाने चालू खरीप हंगाममधील पीक पाहणी संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठीचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवला होता. त्यानुसार शेतकऱ्यांची पीक पाहणीची मुदत ३० सप्टेंबरला संपली. आता ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक गावातील पीक पाहणी न झालेल्या शेताची पीक पाहणी सहायकांमार्फत पूर्ण करायची आहे. जिल्हाधिकाऱ्यांना कळवल्यानुसार, सर्व सहायक प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी करत आहेत, याचा दैनंदिन आढावा घ्यावा. बहुतांशवेळा गावांपासून लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक राहिलेली असते. शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे ही पाहणी सहायकामार्फत पूर्ण करणे आवश्यक आहे.
सहायकाने केलेल्या पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करणे अनिवार्य आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणीची नोंद सातबारा उताऱ्यावर प्रसिद्ध होते. त्यामुळे शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT