कोकण

शासकीय धर्मशाळेच्या जागेवर अतिक्रमण

CD

96007

शासकीय धर्मशाळेच्या
जागेवर अतिक्रमण

सामंत ः फोंडाघाट ग्रामपंचायतीविरोधात उपोषण

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ ः फोंडाघाट ग्रामपंचायतीकडून शासकीय धर्मशाळेच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याचा आरोप करत याबाबत तक्रार करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी फोंडाघाट बिजलीनगर येथील समीर सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
श्री. सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘‘फोंडाघाट ग्रामपंचायतीकडून शासकीय जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम केले असून शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला आहे. ग्रामपंचायत इमारत बांधकाम, संरक्षक भिंत बांधताना आवश्यक असलेल्या कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. कणकवली तहलीदार यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या जागेची भूमि अभिलेखमार्फत मोजणी करून घेऊन सरकारी धर्मशाळेच्या जागेत अतिक्रमण होत असल्याने अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्या अनुषंगाने अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.’’
---
दक्षता न घेतल्याने नियमभंग
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांनी राज्य मार्ग दर्जाच्या रस्त्याच्या लगत कोणतेही नवीन बांधकाम करताना नियमानुसार आवश्यक ते अंतर ठेवणे आवश्यक आहे. मात्र, फोंडाघाट ग्रामपंचायतीने ही दक्षता न घेतल्यामुळे नियमांचा भंग झाला आहे. हे बांधकाम अनधिकृत ठरत असल्याचे लेखी ग्रामपंचायतला कळविलेले आहे. असे असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने श्री. सामंत यांनी संबंधितांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT