कोकण

राजापूर-नाटेत मद्यविक्री करणाऱ्या दोघांसह रिक्षा ताब्यात

CD

नाटेत मद्य विक्री करणाऱ्या
दोघांसह रिक्षा ताब्यात
राजापूर, ता. १ : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्री गस्त घालत असताना नाटे पोलिसांनी नाटे-जैतापूर मार्गावर विनापरवाना मद्य वाहतूक व विक्री करणाऱ्याविरोधात धडक कारवाई केली. यामध्ये नाटे पोलिसांनी एका रिक्षासह देशी-विदेशी दारू असा एकूण दोन लाख १० हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित गणेश रमेश सुर्वे (रा. तुळसुंदे) आणि नीलेश प्रभाकर आडीवरेकर (रा. मिठगावणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नाटे पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना ऑटो रिक्षाद्वारे अवैधपणे दारू विक्री होत असल्याची माहिती नाटे पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोहोचून पोलिसांकडून रिक्षाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना विनापरवाना मद्यवाहतूक व विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कारवाई करताना मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नाटे पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळमध्ये पडद्यामागे राजकीय घडामोडी; अध्यक्ष निवडीआधी संचालकांना घरातून उचललं; सतेज पाटलांचे १३ संचालक सहलीवर, महायुतीचे संचालक गोव्याला जाणार?

IND A vs NZ A Live : W,W,W... १ धाव ३ विकेट्स; गंभीरने ज्याला कमी लेखले, त्याने मॅच फिरवली; शेवटच्या षटकांत नाट्यमय घडामोडी

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची माधुरी दीक्षितलाही भुरळ; नम्रता संभेरावसमोर म्हटला लॉलीचा तो फेमस डायलॉग, सगळे पाहताच राहिले

Numerology: 'या' मूलांकाच्या लोकांना प्रिय असते प्रायव्हसी,स्वत:ची स्पेस! पार्टनरसोबत असूनही एकटे राहणे का आवडते?

Latest Marathi News Live Update : कोरड्या कृष्णा नदीपात्रात राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT