कोकण

ओबीसी, तिलोरी आरक्षणाला धक्का नाही

CD

ओबीसी, तिलोरी आरक्षणाला धक्का नाही
मंत्री उदय सामंत ः दोन्ही समाजाच्या प्रमुखांशी बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : कोकणातील तिलोरी कुणबी आणि ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅझेटीअरसंदर्भात जो गैरसमज होता, त्याबाबत या समाजाच्या प्रमुख नेत्यांशी आज चर्चा झाली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला यामुळे कसलाही धक्का लागणार नाही, असा विश्वास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
ओबीसी, कुणबी समाजाच्या शंकांचे शासनस्तरावर पूर्ण समाधान व्हावे, यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या प्रमुख नेत्याशी मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटीअरसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सामंत म्हणाले, ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या नेत्यांशी सुमारे दीड तास चर्च झाली. ९ ऑक्टोबरला मराठा आरक्षणाविरुद्ध या समाजाचे मुंबईत आंदोलन आहे. या पार्श्वभूमीवर आज या समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. हैदराबाद गॅझेटीअर हे त्या भागापुरते मर्यादित आहे. त्याचा कोकणाशी काही संबंध नाही. यामुळे ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही किंवा ते कमी होणार नाही, तसा शब्द मी तुम्हाला देतो.
हैदराबाद गॅझेटीअरसंदर्भात जिल्ह्यात एकही दाखला सापडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३६३ कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. परंतु त्यापैकी आतापर्यंत फक्त १५ दाखले मिळाले आहेत. परंतु त्यांची पूर्ण जातपडताळणी झालेली नाही. लांजा, संगमेश्वर, देवरूख, आदी भागामध्ये या नोंदी सापडल्या आहेत, असे सामंत म्हणाले.

चौकट...
पूरग्रस्तांच्या घराला मदतीचे तोरण बांधणार
दसरा मेळावा हा शिवसेनेची परंपरा आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली असून पूरग्रस्त जिल्ह्यामध्ये जाऊन मदत करून त्यांच्या घराला तोरण बांधून दसरा साजरा करण्यासाठी आम्ही सर्व जाणार आहोत, असे उदय सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT