कोकण

देवगडच्या मातीचा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ला गंध

CD

96196

देवगडच्या मातीचा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ला गंध
देवगड ः ग्रामीण भागातील वास्तवतेचे चित्र परावर्तित होणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या मराठी चित्रपटाचा प्रारंभाचा प्रयोग येथील चित्रपटगृहात झाला. चित्रपटातील काही कलाकार आणि तांत्रिक जबाबदारी सांभाळणाऱ्या मंडळींच्या उपस्थितीत प्रयोग दाखविला. चित्रपटातील स्थानिक कलाकार विद्याधर कार्लेकर यांच्या हस्ते प्रारंभाच्या प्रयोगाचे श्रीफळ वाढवले. काही प्रमाणात ग्रामीण भागात चित्रीकरण झालेल्या बहुचर्चित ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या मराठी चित्रपटात काही स्थानिक कलाकारांना सोबत घेत ग्रामीण भागातील वास्तवतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. वीणा जामकर, प्रल्हाद कुडतडकर, सायंकित कामत, स्वानंदी टिकेकर, सुनील तावडे आदी प्रमुख कलाकारांसह यामध्ये काही स्थानिक तसेच जिल्ह्यातील कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रारंभाच्या प्रयोगावेळी स्थानिकांची गर्दी होती. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, चारुदत्त सोमण, मधुसुदन फाटक, नगरसेविका तन्वी चांदोस्कर आदी उपस्थित होते.
...................
96197

धनुर्विद्या स्पर्धेमध्ये प्रांजली वाडेकरला रौप्य
देवगड ः मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्येमधील एका प्रकारच्या स्पर्धेत येथील स. ह. केळकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रांजली वाडेकर (रा. वाडातर) हिने रौप्यपदक प्राप्त केले. अंधेरी (मुंबई) येथील भवन्स महाविद्यालय यांनी ठाणे येथील सिंधुताई सपकाळ धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात ही स्पर्धा आयोजित केली होती. तिला सातारा येथील दृष्टी धनुर्विद्या अकादमीचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रांजलीचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Facial Recognition: चेहरा स्कॅन, रिपोर्ट सेकंदात! स्टेशनमध्ये गुन्हेगार शिरताच पकडले जातील; पोलिसांची नवी सिस्टम अॅक्शनमध्ये

Meta ची मोठी कारवाई! १६ वर्षांखालील मुलांचं इंस्टाग्राम-फेसबुक अकाउंट्स १० डिसेंबरपर्यंत कायमची डिलीट होणार, हे आहे कारण

Kalyan crime : हिंदी बोलल्याने मराठी तरुणाला लोकलमध्ये मराठी लोकांची मारहाण, मानसिक तणावातून संपवले जीवन

Maharashtra Leopard : मानव-बिबट संघर्षावर उपाय; नसबंदीसाठी राज्य सरकारचा हिरवा झेंडा!

Tejashwi Yadav Reaction on Nitish Kumar Oath : नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT