कोकण

धम्मचक्र प्रवर्तन दिन सावंतवाडीत उत्साहात

CD

96431

धम्मचक्र प्रवर्तन दिन
सावंतवाडीत उत्साहात

सावंतवाडी, ता. ४ ः भारतीय बौद्ध महासभेच्या सावंतवाडी शाखेमध्ये ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रारंभी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विजय नेमळेकर व मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर सभागृहात बौद्धाचार्य मिलिंद मळेकर यांच्या नेतृत्वाखाली त्रिशरण पंचशील म्हणून धार्मिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
जिल्हा संघटक मानसी कदम यांनी प्रास्ताविक करून बौद्ध महासभेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. केंद्रीय शिक्षक अशोक कदम, जिल्हा संघटक ममता जाधव, तालुका सरचिटणीस चंद्रशेखर जाधव यांनी धर्मांतराचे महत्त्व सांगून बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन का केले, याबाबत मार्गदर्शन केले. प्रियदर्शनी सुनील जाधव, भावना कदम, मीरा नेमळेकर, कविता निगुडकर, अश्विनी जाधव, गौतमी कांबळे, सुवर्णा तेंडुलकर, मोहन जाधव, अनिशा जाधव, शिवानी पवार, जयश्री पाटणकर, ज्योती जाधव, निधी कांबळे, संपदा कदम, जागृती जाधव, वर्षा कदम, मिलिंद नेमळेकर, दिलीप जाधव आदींनी शुभेच्छा दिल्या. प्रतिभा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुनील जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT