कोकण

-चिपळुणात आज गोविंदगड रन मॅरेथॉन स्पर्धा

CD

चिपळुणात आज गोविंदगड रन मॅरेथॉन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः गोवळकोटचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक गोविंदगडावर झालेल्या रणसंग्रामाला ५ ऑक्टोबरला २९२ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मरणार्थ ‘गोविंदगड लढाई स्मरण दिन’ व ‘गोविंदगड रन मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. ५) सकाळी ९.३० वाजता स्वा. सावरकर सभागृह येथे स्मरणदिन कार्यक्रम होईल.
या प्रसंगी व्याख्यानासाठी शिव शंभू व्याख्याते बालाजी काशिद (पुणे) यांच्यासह आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, पिलाजीराव गोळे यांचे वंशज मारुती आबा गोळे, इतिहास अभ्यासक संदीप परांजपे, माजी नगराध्यक्ष बापू काणे आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्त गोविंदगड रन मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. स्पर्धा दोन गटात होणार असून, १५ वर्षांखालील गटासाठी ५ किमी तर १६ वर्षांवरील गटासाठी ७ किमी अंतर ठेवण्यात आले आहे. स्पर्धा सकाळी ७ ते ९.३० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (वेस मारुती मंदिर) येथून सुरू होऊन तेथेच संपणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी या स्पर्धेस सहकार्य करावे, असे आवाहन सरनोबत पिलाजीराव गोळे प्रतिष्ठान व राजे सामाजिक प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रथमेश शिंदे, आशिष कानापडे यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT