कोकण

गर्भातील विकृतींना कारणीभूत ठरणारे 6 नवीन जीन

CD

गर्भातील विकृतींना कारणीभूत ठरणारे सहा नवीन ‘जीन’
तज्ज्ञांचे संशोधन ; गर्भधारणेदरम्यानच्या निदानात सुधारणा शक्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 4 ः गर्भधारणेच्या काळात गर्भामध्ये व्यंग असल्याने अपुऱ्या दिवसांत होणारे गर्भपात, बाळाचा मृतावस्थेत जन्म अथवा गंभीर स्वरूपाची निर्माण होणारी गुंतागूंत यासाठी कारणीभूत असलेल्या सहा प्रकारच्या नव्या जीनचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. मुंबईतील आयसीएमआर-एनआयआरआरसीएच आणि नौरोजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल येथील तज्ज्ञांनी प्रगत तंत्रज्ञान डब्ल्यूईएस वापरून गर्भातील विकृतींना कारणीभूत ठरणारे सहा नवीन जीन शोधले आहेत. हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध झाला असून, भारतात प्रसूतिपूर्व (गर्भधारणेदरम्यान) निदान आणि समुपदेशन यामध्ये सुधारणा करता येईल.
जगभरात साधारण ५% गर्भधारणेवर विकृतींमुळे गर्भपात, मृत जन्म आणि बाळाच्या आजारांचे प्रमाण वाढते. आत्तापर्यंत वापरल्या जाणाऱ्या चाचण्या (कॅरियोटायपिंग, क्रोमोसोमल मायक्रोअॅरे) मर्यादित बदल ओळखू शकतात; पण निम्म्याहून अधिक प्रकरणावर उत्तर मिळत नाही.
यावर उपाय म्हणून वापरण्यात येणारी डब्ल्यूईएस डब्ल्यूईएस ही नवी चाचणी जीनोममधील प्रथिने बनवणाऱ्या भागांचे सखोल विश्लेषण करते तसेच नेमके जीन ओळखते.
या अभ्यासात 44 गंभीर विकृती असलेल्या गर्भांची तपासणी करण्यात आली. नियमित चाचण्या झाल्यानंतर न उलगडलेल्या प्रकरणांमध्ये डब्ल्यूईएस वापरून नवीन माहिती मिळाली. यातून ट्रायसोमी 21 आणि 13 सारख्या ज्ञात विकृतींची पुष्टी झाली तसेच ६ नवीन जीन्स आढळले, जे गर्भाच्या रचनेतील बिघाडात भूमिका बजावू शकतात. हे निष्कर्ष निदानासाठी महत्त्वाचे आहेतच शिवाय भावी संशोधनाला दिशा देणारेही ठरू शकतात. या संशोधनात डॉ. शैलेश पांडे (प्रमुख वैज्ञानिक), डॉ. डीव्हीएस सुधाकर (वैज्ञानिक), डॉ. शैनी जोसेफ (वैज्ञानिक), डॉ. वंदना बन्सल (प्राध्यापिका, ओबीजीवाय आणि फीटल मेडिसिन तज्ज्ञ, नौरोजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल) या चमूने भाग घेतला.
---
यामुळे फायदा कसा होईल?
* त्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होईल
* विकृती टाळण्यासाठी संशोधनाला नवीन दिशा
* कुटुंबांना योग्य आनुवंशिक समुपदेशन देता येईल
---
कोट
आमच्या कामामुळे हे तंत्र सार्वजनिक रुग्णालयांत वापरणे शक्य आहे आणि भारतातील वैद्यकीय सेवांवर थेट परिणाम होऊ शकतो. जसजसे जीनोमिक तंत्रज्ञान अधिक स्वस्त आणि उपलब्ध होईल तसे WESचा वापर प्रसूतिपूर्व निदानात वाढवता येईल. त्यामुळे अस्पष्ट विकृतींचे प्रमाण कमी होईल. भारतात या संदर्भात नवीन तांत्रिक सुविधा आणि प्रशिक्षण उभारणे आवश्यक आहे.

- डॉ. शैलेश पांडे (प्रमुख वैज्ञानिक, ICMR-NIRRCH, मुंबई.)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT