कोकण

केर परिसरामध्ये वाघाचा संचार; ग्रामस्थ भयभीत

CD

96461

केर परिसरामध्ये वाघाचा
संचार; ग्रामस्थ भयभीत

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ४ : केर येथे भर दिवसा पट्टेरी वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळाला. येथील ओंकार देसाई हे सायंकाळी घरी जात असताना रस्त्यावर त्यांना वाघ दृष्टीस पडला. सायंकाळीच एका गायीची शिकार वाघाने केली होती. त्यामुळे भीती वाढली आहे. बिबट्या की पट्टेरी वाघ, हे नेमके समजत नसले तरी ग्रामस्थांत मात्र भीती आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी केर येथील मंगेश देसाई यांची गाय वाघाने ठार केली होती. यातच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ओंकार देसाई हे मोटारीने गावी येत असताना त्यांना समोर वाघ दिसला. या रस्त्यावरून दुचाकीस्वारांची रात्री उशिरापर्यंत ये-जा असते. त्यामुळे ग्रामस्थांत भीती आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कल्पना दिली. त्यांनी कर्मचारी पाठवण्याची ग्वाही दिली.
केर येथे भर दिवसा वाघाचा संचार पाहता हा वाघ मूळ अधिवासातील आहे की वनविभागाने सोडला?, याबाबत ग्रामस्थांत संभ्रम आहे. कारण वाघ कमालीचा आक्रमक दिसतो. त्यात मुख्य रस्त्यावर बसलेला पाहुन सध्या ग्रामस्थांत प्रचंड भीती आहे. वनविभागाने तातडीने गावात येऊन वातावरण भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT