कोकण

आठल्ये-सप्रे महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी

CD

- rat६p१.jpg-
P२५N९६७७५
संगमेश्वर-शालेय खो-खो स्पर्धेतील विजयी देवरूख महाविद्यालयाचा संघ.

‘आठल्ये-सप्रे’चा मुलींचा संघ विजयी
खो-खो स्पर्धा ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ रत्नागिरी जिल्हा शालेय खो-खो स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल आणि गुरूवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरूखने उत्तम पद्धतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाने पात्रता सिद्ध करून जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची गेली अनेक वर्षाची परंपरा कायम राखली आहे. या स्पर्धेतील मुलांच्या गटात महाविद्यालयाला उपविजेतेपद प्राप्त झाले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघाने मिळवलेल्या यशाचे अभिनंदन करण्यात आले. यासाठी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थी खेळाडूंबरोबर संवाद साधला. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, जिमखाना प्रमुख प्रा. धनंजय दळवी, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे, तसेच शिक्षक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या दोन्ही संघांना क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर, क्रीडाशिक्षक तानाजी कदम व सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजयी झालेल्या मुलींच्या संघात दिव्या सनगले, दीपाली सनगले, प्रिती सनगले, सानिका सनगले, सिद्धी चोरगे, सिद्धी पर्शराम, स्नेहा गावडे, सृष्टी आग्रे, पूर्वा टक्के, श्रुती किंजळे, सानिका आग्रे, अक्षरा कांबळे, पूर्वा वेद्रे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT