कोकण

अभ्यास असेल तर सूत्रसंचालनात यश मिळेल

CD

सूत्रसंचालन क्षेत्रात करिअर करण्याची संधी
विघ्नेश जोशी ः अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखतकार, उद्घोषक या क्षेत्रात निश्चितच व्यवसाय म्हणून शंभर टक्के यशस्वी होऊ शकतात; मात्र, हे क्षेत्र आपल्या आयुष्याचा पूर्णवेळ व्यवसाय बनवायचा असेल तर त्यामागे सातत्य, अभ्यास आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक आहे. स्पर्धा नक्की आहे; पण आपण तयारी केली, तंत्र आत्मसात केले तर या क्षेत्रातही सहज यश मिळवता येते, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते, प्रसिद्ध सूत्रसंचालक व निवेदक विघ्नेश जोशी यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्यावतीने शहरातील बांदल हायस्कूलच्या सभागृहात सूत्रसंचालन व निवेदन कार्यशाळेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ४०हून अधिक प्रशिक्षणार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. या वेळी जोशी यांच्यासह कवी प्रमोद जोशी, नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, सचिव डॉ. मीनल ओक, उपाध्यक्ष योगेश बांडागळे, संचालिका मनीषा दामले, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी असा अनुभवी आणि ज्ञानी मार्गदर्शक लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कवी प्रमोद जोशी यांनी आपल्या समर्पक कवितेद्वारे विघ्नेश जोशी यांच्या सूत्रसंचालक, निवेदक आणि अभिनेता म्हणूनच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. मान्यवरांचा परिचय संगीता जोशी यांनी करून दिला. विघ्नेश जोशी यांनी आपल्या सत्रात सूत्रसंचालन, निवेदन आणि मुलाखतकार म्हणून कार्य करताना येणाऱ्या विविध परिस्थितींविषयी अनुभव सांगितले. सूत्रसंचालक हा केवळ वक्ता नसून, तो संवादाचा पूल असतो. त्याच्यात निरीक्षणशक्ती, शब्दांची जाण आणि मंचावरची समज असावी, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश बापट यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT